EVM शिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकूच शकत नाही.” – राहुल गांधी

शिवाजी पार्कवर जाहीर सभा, INDIA गठबंधन च्या नेत्यांच्या उपस्थितीत भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप.
मुंबई : EVM शिवाय मोदी आणि त्यामागे असलेली मनुवादी शक्ती (RSS) सत्तेत येऊ शकत नाही. असा घणाघात राहुल गांधींनी केला. मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपावेळी ते बोलत होते.
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज (रविवारी 17 मार्च) मुंबईतील शिवाजी पार्कवर (Shivaji Park) जाहीर सभा पार पडली. या सभेला देशातील दिग्गज नेते उपस्थित होते. शिवाजी पार्कवरील सभेच्या माध्यमातून काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराची सुरुवात करण्यात आली. मुंबईतील शिवाजी पार्कवर होणाऱ्या आजच्या सभेला राहुल गांधी, प्रियांका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडी चे प्रकाश आंबेडकर, आदित्य ठाकरे, संजय राऊत, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, वर्षा गायकवाड, रेवांथ रेड्डी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
ईडी, इन्कम टॅक्स, सी बी आय यांचा धाक राजकीय नेत्यांना दाखवला जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक लोक हे भीतीमुळे पक्ष सोडून गेलेत. जेलची भीती दाखवून घाबरवलं जात आहे. मोदी हा केवळ मुखवटा आहे. खरी शक्ती ही RSS आहे जिला संविधान नष्ट करून मनुवादी व्यवस्था भारतात लागू करायची आहे असे सांगितले.
शिवाजी पार्कवर दाखल होताच राहुल गांधींनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालाही वंदन केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत