‘मविआ’मध्ये वंचित बहुजन आघाडीला 4 जागा.

निवडणुकीच्या तारखा जवळ येत असतानाच राज्यात महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) जागावाटप पूर्ण झाल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचा दावाही संजय राऊत यांनी आज बोलताना केला. एका दुसऱ्या जागेवर किरकोळ चर्चा होईल, असे त्यांनी नमूद केले.
राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीला चार जागांची ऑफर देण्यात आली आहे. त्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांचा मतदारसंघ असलेल्या अकोला लोकसभेचाही समावेश आहे. त्यामुळे निर्णय काय घ्यायचा हा सर्वस्वी त्यांचा निर्णय त्यांचा असल्याचे संजय राऊत म्हणाले. राऊत यांनी बोलताना राज्यातील मुस्लिम आणि दलित वर्ग यावेळी भाजपला मतदान करणार नसल्याचे म्हणाले. वंचित आणि एमआयएमच्या संभाव्य आघाडीवरती संजय राऊत यांनी भाष्य केले. या दोन्ही पक्षांची युती होणार नाही, आम्ही तीन प्रमुख पक्ष आणि इतर घटक पक्ष सोबत असल्याचे संजय राऊत म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत