महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंत रविदास महाराज

संत शिरोमणी गुरु रविदास जी महाराज लेख शृंखला – १७

गुरू रविदास जयंतीनिमित्त पुष्प 17..

बेगमपुरा सहर कौ नाउ,दुखू अंदोहु नहीं तिही ठांउ!
नां तसवीस खिराजु न मालु , खुउफू न खता न तरसू जवालू!!
अब मोहि खूब वतन गह पाई,ऊहां खैरि सदा मेरे भाई!!
काइमु दाइमु सदा पातिसाही,दोम न सेम एक सो आही!
आबादानु सदा मसहूर ,ऊहां गनी बसहि मामूर!!
तिउ तिउ सैल करहि जिउ भावै,महरम महल न कौ अटकावै!
कहि रविदास खलास चमारा जो हम सहरी सू मीतू हमारा!!

वरील शब्द फक्त एका कवीची कविता नाही. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचा (preamble) अनमोल अलंकार आहे .गुरू रविदासजीचे सामाजिक, आर्थिक, राजनितीक,सांस्कृतिक परिवर्तनाचे कार्य म्हणजे त्यांनी आयुष्यभर भक्तिमार्गातून लोकजागरण करून, केलेल्या क्रांतीची न विझणारी धग आहे….! या धगीतून आदि धर्म, सतनामी संप्रदाय, मा.कांशीरामजीं, बाबू जगजीवनराम ,राष्ट्रीय चर्मकार महासंघ, लोकनेते बबनराव घोलप साहेब ही ह्या धगीतल्या आगीतली उगवलेलीअग्नी फुले आहेत. तर बेगमपुरा ही गुरू रविदासजीने ज्वालामुखीवर लावलेली बाग आहे.त्या बागेतील अग्नीफुलांना आलेलेआधुनिक फळ म्हणजे “भारतीय संविधान आणि संयुक्त राष्ट्र संघाने मानवाधिकाराला दिलेली मान्यता.” गुरू रविदास समाज चिंतक होते.अर्थशास्त्रज्ञ होते.तत्त्वज्ञानी होते.समतेवर आधारलेल्या भुक व दुख मुक्त एका प्रसन्न आदर्श राजाची संतत्व मनाची कल्पना त्यांनी समाजासमोर ठेवली आहे.तुळशीदास लिखीत रामचरीत मानस मधील “राम राज्य” त्याना अपेक्षित नव्हते… चौदाव्या शतकात भारतात मुस्लिम व हिदू राजे राज्य करीत होते. ब्राम्हण सर्वत्र पूजनीय होते.दानधर्मातून ते दक्षिणेतून संपत्तीअर्जन संचयन करीत.क्षत्रिय भुस्वामी होते.वैश्य व्यापारी होते आणि शुद्र श्रम करून ही पोट भरू शकत नव्हते. श्रीमंत हत्ती घोडे उंट सोन्याने सजवून घरी पाळायचे.शुद्रांना धड कपडे नसायचे. शुद्राच्या स्पर्शाने मंदीर तलाव,रस्ते अपवित्र होत.धन संचय, पशू संचय करण्यास बंदी.दागिने घालण्यास बंदी, घोड्यावर बसण्यास पालखीत बसण्यास बंदी हया राजमान्य धरमाज्ञा ..! त्या आज्ञा मोडल्यास , वस्तीच्या वस्ती जाळून राख व्हायच्या , वर तो कुप्रसिद्ध जिजीया कर .. जबरदस्तीचे धर्मातर .. पाखंडी ब्राम्हण सांगायचे गरीबी श्रीमंती पूर्व जन्माची फळे आहेत…मुल्ला मोलवी सांगायचे अल्लाहने जो कुछ दिया हे उससे आखिरत करनेका.अल्लाहको बिगाड पसंद नही है…! राज्यकर्त्ये धर्माच्या अफूने एका हातातली तलवार दुसर्‍या हातातील तराजूला सोडू देत नव्हती. रयतेच्या कल्याणाच्या नावाखाली सगळी षडयंत्रे चालू असताना ,काळजातील मनात हात घालून, घरसंसार राजपाट न सोडता, दुःखमुक्तीचा लढवय्या मार्ग निर्गुण निराकाराच्या भक्तितून शिकवला .त्या काळच्या भारतभरचे राजे, महाराजे, वजीर, सुलतान ,संत ,महंत रविदासाचे शिष्य त्यांच्या स्वयंप्रेरणेने झाले होते. हा एक महाचमत्कार होता. आदर्श राज्य समजावून सांगताना ते म्हणतात ….
आता आपण सर्वजण एक आदर्श राज्य “बेगमपुर” म्हणजे गम नसणारे दुख विरहीत असे राज्य बनवुया . ज्या राज्यात कसले ही दुख नाही. (अंदोही ) दंगा झगडा फसाद नाही.त्या ठिकाणी (तसवीस ) चिंता काळज्या नाहीत. सत्कार्य केल्यामुळे( खिराज)पश्चाताप होत नाही..कसल्याही प्रकारचे जिजिया सारखे कर नाहीत. सर्वाना समान दर्जा असलेले नागरिकत्व असलेले कसल्याही प्रकारचे अभाव (जवालू) नसलेले .सर्वाचे जीवनमान (आबादान) सुखमय असणारे .सर्वत्र स्वैर व बिना अटकाव संचार असणारे “कल्याणकारी कायद्याचे ” (मानूर) मनात खोल रूजलेली गणराज्याची राजवट असणारे राज्य बनवू या. “सिकींग बेगमपुरा ” नावाने गेल ओमवेट या लेखिकेने यावर भाष्य केले आहे.अश्या कल्पनेला स्वप्नरंजन युटोपिया म्हणतात.समाजवादाची, साम्यवादाची,लोकशाहीची,हुकूमशाहीची,राजेशाहीची ,संसदेची कसली ही राजवट असू द्या पण ती बेगमपुर (welfare state) असावे. अश्या बेगमपुरात माझे चमारपण ( inferior complex) खलास होऊन जाईल .मी प्रसन्न राहील….! मित्रानो अभ्यासक्रमात प्लुटो आहे.कार्ल मार्क्स आहे.सर टाइम्स मोअर आहे.कौटिल्य आहे गांधी सावरकर आहेत.रामराज्य आहे पण…रविराज्य नाही .रविराज्य म्हणजेच बेगमपुर ,त्या बेगमपुरला जाण्याचा मार्ग हा रविमार्गआहे.रवीमार्ग सांगणारे रविदास नाही हे भारताचे दुर्दैवी आहे.असा बेगमपूर भारतातील कोणत्याच संताने सांगितलेला नाही. या कारणास्तव कदाचित परमपुज्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपला “The untouchable “हा ग्रंथ रविदासजीना अर्पण केला आहे.जगाच्या कल्याणासाठी कल्याणकारी सरकार चालविण्यासाठी बेगमपुरला जगाच्या अंतापर्यंत पर्याय सापडणार नाही…!
जय रविदास
लेखक.ॲड.आनंद गवळी.
राष्ट्रीय चर्मकार महासंघ
राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रीय

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!