सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश डॉ. चंद्रचूडने केले प्रज्ञाचे अभिनंदन

फोटोत सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांच्याबरोबर दिसते ती मुलगी आहे प्रज्ञा. तिचे अभिनंदन करण्यासाठी चंद्रचूड यांनी आज १३ मार्च, २०२४ रोजी मुद्दाम सुप्रीम कोर्टातील लंच लौंजमध्ये तिला तिच्या आई वडिलांसह जेवणास बोलावले होते. सुप्रीम कोर्टाचे सर्व न्यायाधीश या जेवणास आणि प्रज्ञाचे अभिनंदन करण्यास हजर होते. असा सन्मान मिळणारी ही प्रज्ञा आहे तरी कोण?
सुप्रीम कोर्टातील एका अन्य न्यायाधीशांच्या घरी कुक असलेल्या एकाची प्रज्ञा ही मुलगी. हुशार आणि आजूबाजूला कायद्याचे वातावरण. त्यामुळे विधी पदवीधर झाली. मग सुप्रीम कोर्टाच्या रीसर्च आणि प्लॅनिंग सेंटरमध्ये विधी संशोधक म्हणून संधी मिळाली. त्या अनुभवावर आणि हुषारीवर ती विधी क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेतील सहा विद्यापीठात पात्र ठरली आहे. कोलंबिया, पेनिंसिल्व्हनिया, शिकागो, न्यूयॉर्क, बरकले आणि मिशिगन ही ती विद्यापीठे. मिशिगन विद्यापीठाने तिला वार्षिक ५० हजार डॉलरची शिष्यवृत्तीसुद्धा देऊ केली आहे. यापैकी एक विद्यापीठ निवडून ती लवकरच अमेरिकेस जाईल. अश्या गुणी मुलीचे अभिनंदन
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत
व्वा.. खूप छान !