नागपुरात आज ओबीसी कुणबी महासंघाचा मोर्चा

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये आदी मागण्यासाठी सर्वशाखीय कुणबी ओबीसी कृती समिती आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज, १८ सप्टेंबरला दुपारी १ वाजता संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. संविधान चौकात कृती समितीच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांची भेट घेत उपोषण समाप्त करण्याचे आवाहन केले. यावर सरकारने लेखी आश्वासन द्यावे, अशी भूमिका घेत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा आणि सोमवारी मोर्चा काढण्याच्या निर्णयावर समितीचे नेते ठाम राहिले. रविवारी साखळी उपोषणाला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. या साखळी उपोषणाला ओबीसी संघटनांचा पाठिंबा सुरू असून माळी महासंघानेही मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण नको या मागणीसाठी संविधान चौकातच ठिय्या आंदोलन केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत