सामाजिक इतिहासाचा मागोवा

हंसराज कांबळे ✍️
8626021520
नागपूर.
भारतातील ब्राह्मणांच्या अंगी आणि नसानसात असमानतेचे धोरण कूटकूट भरून असून इथल्या प्रस्थापित बहुजनांना विचारशून्यतेत ठेवून त्यांना गुलाम बनविणे , कूटनिती अवलंबून सत्ता हस्तगत करणे हाच त्यांचा खरा उद्देश आहे.
भारताचा इतिहास हा बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म यामधील मरणांतिक संघर्षाचा इतिहास आहे. इतिहासाची पाने चाळली असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात -
कारण जो कोणी भारताचा इतिहास जाणू इच्छितो, " त्याला भारताचा इतिहास हा ब्राह्मण धर्म व बौद्ध धर्म यांच्या प्रभुत्वासाठी झालेल्या संघर्षा खेरीज इतर काही नाही हे समजणे आवश्यक आहे
संदर्भ – क्रांती – प्रतीक्रांती. लेखक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर. पृष्ठ. क्रं. 39 पैरा – मधला.
तथागत बुद्धाचा संघर्ष ही ब्राह्मणी विचारसरणीला छेद देणारा असाच होता. पण जसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी आपल्या महान विद्वत्तेच्या भरोशावर पाचव्या स्थित्यंतराला मनुस्मृती जाळून बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची झालर लावून भारतीय संविधानाची निर्मिती केली आणि भारतातल्या सर्व नागरिकांना त्यात समानतेचे अधिकार बहाल केले. आणि हिंदू धर्माला लाथाडून बौद्ध धर्माची स्वतः धम्मदिक्षा घेऊन त्यावेळेस समाजातील लोकांना त्यांनी धम्मदिक्षा दिली. त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी आणि नीतिमत्तेच्या भरोशावर पाचव्या स्थित्यंतरातील महान क्रांतिकारक नेता एकटेच ठरलेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना त्यांच्या ह्यातीत जीवनप्राय यातना भोगून भयंकर असा मनुवादी ब्रामणी विचारधारेतील लोकांविरुद्ध संघर्ष करावा लागला आणि ते म्हणतात -
माझ्या ठिकाणी दुसरा असता तर त्याचा समूळ नाश झाला असता. ह्या त्यांच्या वाक्या वरून आपण निष्कर्ष लावू शकतो की , ब्राह्मण लोक जातीयवाद्याशी किती करकचून होते ह्याचा आपणास प्रत्यय येईल. म्हणून ते म्हणतात –
या हिंदू धर्माने आपले जितके अकल्याण केले आहे तितके अकल्याण कोणत्या साथीच्या रोगाने सुद्धा केले नाही
संदर्भ – खंड. 18.भाग – 3 पृष्ठ. क्रं. 303.वाचा.
भारतातील स्वराज्य , समाजाप्रती घोर चिंता आणि स्वराज्याची फळे कशी चाखायची ह्या इतिहासातील मागोवा घेतांना दूरदृष्टीपणा ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या लिखित खंडात फार मोलाचे मार्गदर्शन देऊन काय म्हणतात ते पहा -
आपल्या देशातील बहुसंख्य लोकांच्या हातातील स्वराज्य म्हणजे भूतांचा बाजार आहे. हेही मला माहित आहे. दलित वर्गावर आमच्या देशातील लोकांनी पेशवाईच्या काळात जे अन्याय, अत्याचार व जुलूम जबरदस्ती केली याची मला आठवण आहे. आणि भावी स्वराज्यात तसेच जुलूम या लोकांवर होतील की काय अशीही मला भीती वाटते. परंतु सदृहस्थांनो ! काही क्षणासाठी जर भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न केला आणि भावी स्वराज्यातील काही वर्गापासून सर्व सामान्य जनतेचे संरक्षण करणाऱ्या घटनादत्त संरक्षण तरतुदीचा तुम्ही विचार केला तर भावी स्वराज्य हा भुतांचा बाजार ठरण्याऐवजी तुमच्या हातात सत्ता येण्याची शक्यता तुम्हाला दिसून येईल आणि इतरा बरोबर तुम्ही देशाचे सार्वभौम राज्यकर्ते व्हाल. भूतकाळाचे भूत तुमच्यावर स्वार होऊ नये , तुमच्या निर्णयावर कोणत्याही भीतीचा किंवा उपकाराचा परिणाम होऊ नये. तुमच्या कल्याणाचा विचार करा म्हणजे माझी खात्री आहे की , तुमचे खरे उद्दिष्ट आहे असे तुम्ही मान्य कराल
संदर्भ – खंड. 18 भाग – 1.पृष्ठ. क्रं. 218.
उपरोक्त संदर्भानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलेली विचार किती आशादायक तर होतेच शिवाय भितीदायकही पण ! पेशवाईच्या काळात जे अन्याय, अत्याचार व जुलूम जबरदस्ती केली जात होती तोच प्रकार आजही होताना दिसत आहे. ह्या त्यांनी व्यक्त केलेल्या भावनातून दिसून येते. परंतु समाज खऱ्या हितकर्त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नीट ओळखू शकला नाही. ही फार मोठी लाजिरवाणी शोकांतिका आहे. आजही त्यांचे विचार तंतोतंत खरे ठरत आहे. आजन्म ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कूटनीती करणाऱ्या ब्राह्मण लोकांपासून स्वतः सावध राहून मी त्यांचे बारसे जेवून आहो आपणास सुद्धा त्याची जाण करून देत आहो. तुम्ही पण सावध असले पाहिजे असा संदेश समाजातील उच्चशिक्षित असणाऱ्या आणि पुढारपण करणाऱ्या लोकांना दिला होता.त्यांचा संदेश आणि इतरांबरोबर तुम्ही देशाचे सार्वभौम राज्यकर्ते व्हाल , तुमच्या हातात सत्ता येण्याची शक्यता तुम्हाला दिसून येईल हे त्यांचे वाक्य सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ , सत्य आहे पण समाजातील भाडोत्री पुढारी समाज हिताला दूर सारून अमिषापोटी , लालसेपोटी मांडीला मांडी लावून सत्ताधारी ब्राह्मणशाहिच्या हातचे बाहुले बनले आहेत. ही शोचनीय बाब असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पूर्णपणे पायमल्ली केलेली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत