स्वाती इंडस्ट्री मार्फत टॅक्स वसुली वर दरोडा टाकून अकोलेकरांची संभाव्य लुट थांबविण्यासाठी वंचित आघाडीची अकोला शहरात ‘एक मिस कॅाल एक सही’ मोहीम.


अकोला, दि. १३ – स्वाती इंडस्ट्री मार्फत टॅक्स वसुली वर दरोडा टाकून अकोलेकरांची केली जाणारी लुट थांबविण्यासाठी ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित आघाडी उद्या रस्त्यावर उतरून अकोला शहरात
‘एक मिस काॅल एक सही’ मोहीम राबविनार असून मनपाची खाजगी टॅक्स वसुली बंद करण्यासाठी आरपारची लढाई सुरू करणार असून शहरातील नागरिकांना सहका-र्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अकोलेकर मतदार म्हणून जनेतेने भाजप नेत्यांना, आमदारांना, नगरसेवकांना काही बेसिक प्रश्न विचारावे असे आवाहन करीत वंचित बहुजन आघाडीने अकोला महापालिकेच्या टॅक्स वसुलीचे काम स्वाती इंडस्ट्रिजला का ? त्याला भाजपाचा विरोध का नाही ? सामान्य जनतेने महापालिकेत शंभर रुपये भरल्यानंतर त्या पैकी आठ रुपये ३९ पैसे कंत्राटदाराच्या घश्यात का घालत आहेत ?महापालिकेचा ५० टक्के टॅक्स अकोलेकर नागरिक स्वतः भरत होते. मग त्यांना थेट टॅक्स मध्ये ८ टक्के सुट का नाही ?महापालिकेत शंभर रुपये भरणाऱ्या अकोलेकरांना थेट आठ रुपये सुट का दिली नाही ? रांची च्या स्वाती इंडस्ट्रिजला कर वसुलीचा ठेका देताना भाजपचे कोणते नेते त्यात लाभार्थी आहेत, थेट पार्टनर आहेत का ? याचा खुलासा भाजप नेत्यांनी केला पाहिजे.अशी मागणी केली आहे.
महापालिका तत्कालिन प्रशासक व आयुक्त कविता द्विवेदी यांनी कर वसुलीचे खाजगीकरण करताना थेट १५०० कोटींचा ठेका स्वाती इंडस्ट्रिजला देताना राज्यात महायुतीचे सरकार होते. तेव्हा भाजप ने याला विरोध का केला नाही.पालकमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांची भूमिका काय होती.असा प्रश्न नागरिकांनी विचारावे असे आवाहन केले आहे.मालमत्ता पुनर्मुल्यांकनाच्या नावाखाली महापालिकेच्या सर्वच कर वसुलीचे खाजगीकरण का करण्यात आले? स्वाती इंडस्ट्रिज ला ठेका दिल्यानंतर मालमत्ता पुनर्मुल्यांकन (प्रापर्टी असेसमेंट) अद्याप का सुरु झाले नाही.हा मूलभूत प्रश्न उभा केला आहे.सामान्य अकोलेकर हे अतिशय शिस्तप्रिय, नियम न मोडणारे आहेत म्हणून वर्षाचा पन्नास कोटींचा टॅक्स स्वतःच महापालिकेत भरतात.असे असताना स्वाती इंडस्ट्रिजला यातून थेट चार ते साडे चार कोटी का दिले जात आहे.तसेच अकोल्याचा १०० कोटींचा टॅक्स वसुलीतून स्वाती इंडस्ट्रिज च्या घशात ८ कोटी ३९ लाख कोणता नेता, पदाधिकारी घालत आहे? या आठ कोटी रुपयांमध्ये शहरातील आवश्यक सुविधा का मार्गी लावण्यात आली नाही ? महापालिकेतील अत्यावश्यक कामांचे खाजगीकरण करण्यामागे आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या हाताला कुठले ही काम राहू नये यासाठी भाजप च्या कोणत्या नेत्यांनी प्रयत्न केले ? जास्तीच मालमत्ता कर थोपवून भाजप सत्ता काळात अकोलेकरांची लुट झाली. आता भाजप नेत्यांनी छुप्या पध्दतीने अकोलेकरांचे टॅक्स वसुलीचे कामच स्वाती इंडस्ट्रिजला देत जनतेची लुट होत आहे.
ती का आणि केव्हा थांबणार ? राज्यातील महायुतीचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना राज्यात महापालिका कर वसुलीचे खाजगीकरण करायचे आहे काय असल्यास त्यांनी मुंबई, ठाण्यात खाजगीकरण का केले नाही. अकोल्यात का केले.असे अनेक प्रश्न अकोलेकरा समोर मांडून भाजप प्रणित लुटीचा डाव उघडकीस आणला जाणार आहे.त्यासाठी वंचित
नायगांव, अकोट फैल, हनुमान चौक अकोट फैल, महाकाली चौक, तारफैल, श्रीवास्तव चौक, डाबकी रोड, गजानन नगर रोड, मलकापूर, उमरी, गुडधी, कौलखेड, जठारपेठ, गिता नगर, बायपास, खडकी, शिवणी, सातव चौक, दुर्गा चौक, सिव्हील लाईन चौक, खैर मो. प्लॉट, जय हिंद चौक, हरीहरपेठ, रतनलाल प्लॉट चौक, इनकम टॅक्स चौक, लोकमान्य टिळक पुतळया मागे मनपा जवळ, तसेच सहकार नगर, जठार पेठ, रामदास पेठ, खंडेलवाल भवन, जवाहर नगर चौक ३६ पेक्षा अधिक ठिकाणी टॅक्स वसुलीसाठी स्वाती इंडस्ट्रिज नेमणूक घोटाळा आणि वसुली करताना सामान्य अकोलेकरांना जो दबाव टाकत आहे तो वंचित बहूजन विकास आघाडी खपवून घेणार नाही.हे सांगण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे.स्वाती इंडस्ट्रिजच्या जबरदस्ती कर वसुलीच्या विरोधात उभारलेल्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन वंचित आघाडीचे वतीने करण्यात आले आहे.
हा मुद्दा सोडविण्यासाठी निलेश देव ह्यांनी आझाद मैदान येथे आंदोलन करून त्याची चौकशी लावली आहे.स्वाक्षरी मोहीम नंतर काल वांचीतचे पदाधिकारी ह्यांनी मनपा आयुक्त ह्याची भेट घेवून त्यांना तातडीने निर्णय घेण्याचा आग्रह केला आहे.उद्या होणाऱ्या स्वाक्षरी मोहीम नंतर मुख्यमंत्र्यां कडे निवेदन सोपवून ही नेमणूक रद्द करण्यात येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत