धाराशिव येथे समता सैनिक दल स्थापना दिवस उत्साहात साजरा.

धाराशिव : येथे समता सैनिक दल स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धाराशिव येथे समता सैनिक दल स्थापना दिवस या औचित्याने समता सैनिक दलाच्या धाराशिव तालुक्यात दलाची बांधणी करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी समता सैनिक दलाचे तालुका अध्यक्ष स्वराज जानराव व समता सैनिक दलाचे सचिव सचिन दिलपाक यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सुरवातीला सैनिकांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना – सलामी देण्यात आली .त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व समता सैनिक दलाची प्रतिज्ञा सामूहिकरित्या घेण्यात आली . या बैठिकेदरम्यान नवीन नोंदणी झालेल्या सर्व सैनिकांचे स्वागत करण्यात आले . बैठीकीदरम्यान सर्व सैनिकांनी आपली मते मांडली व नवीन जास्तीत जास्त सैनिक तयार करण्याचा ठराव या समता सैनिक दलाच्या स्थापना दलाच्या स्थापनेच्या दिनी घेण्यात आला . यावेळी या कार्यक्रमासाठी बुद्धिस्ट सोसायटीचे धनंजय वाघमारे , दिपक डावरे सर , पृथ्वीराज चिलवंत, संतोष बनसोडे , नितीन लांडगे , अमरदीप धावारे, सम्यक चिलवंत , तेजस गायकवाड , आशिष कांबळे , अमोल लांडगे ,लक्ष्मण सोनावणे , आदी सैनिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत