डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन भूमिपूजन सोहळा संपन्न

( राहुल हंडोरे यांजकडून )
अंबरनाथ दि. 10 मार्च 24
डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय
वाचनालय लोकार्पण सोहळा अंबरनाथ पूर्वेला, गावदेवी, बी कॅबिन रोड येथे भव्य प्रमाणात संपन्न झाला.
अंबरनाथचे लोकप्रिय आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी बाबासाहेब आंबेडकर संस्क्रुतिक भवना साठी पाच कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून घेतला आहे. आज 10 मार्च रोजी संस्क्रुतिक भवन भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
प्रारंभी बौद्ध भन्ते कश्यप यांनी बुद्धवंदना घेतली. या नंतर आमदार डॉ बालाजी किणीकर, अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत रसाळ, माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठान अध्यक्ष राहुल हंडोरे, बुद्ध जयंती अध्यक्ष सुधाकर सरवदे, सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर अससोसिएशन सचिव सुधाकर बर्वे, भटक्या विमुक्त समाजाचे नेते कैलास भांडलकर, महिला समाजसेविका लता डोंगरे, धम्मदीप विहाराचे अध्यक्ष इंद्रपाल कांबळे, कार्याध्यक्ष विजय कालिबाग, रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ कार्येकर्ते दादासाहेब देठे आदींनी भूमिपूजन केले.
या प्रसंगी भाजपचे जिल्हा सचिव अभिजित करंजुले, समाजसेवक अजय मोहारीकर, माजी नगरसेविका सुवर्णा साळुंखे, सुषमा रसाळ, नंदा देशपांडे, स्मिता कांबळे आदींची विशेष उपस्थिती होती.
या प्रसंगी जेष्ठ समाजसेवक संजय जाधव, संतोष पगारे, भास्कर बोराळे, डॉ पी बी ढोके, शिलघोष, बाळकृष्ण कदम, तृशांत जाधव, हनुमंत इजगल, सर्जेराव वाघमारे, विजय सोनवणे, बबन सोनावणे, माधव गायकवाड, मोहन कांबळे, महेंद्र गायकवाड, अजिक्य बर्वे तसेच विविध बुद्ध विहारातील उपासक, उपासिका बहुसंख्येने उपस्थित होत्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत