संत शिरोमणी गुरु रविदास जी महाराज लेख शृंखला- १५

गुरू रविदास जयंतीनिमित्त पुष्प 15 वे
तथागत गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती होऊन “दिव्य दृष्टी” प्राप्त झाली.व ते बुद्ध झाले.त्या अगोदर ते” बोधिसत्व” होते.”बुद्ध “होण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती म्हणजे बोधिसत्व. !बोधिसत्व ते बुद्ध या स्थितंतरात दहा ” पारमिता” आहेत. ह्या दहा पायऱ्या आहेत.त्याला अवस्था असे म्हणतात.बोधिसत्वाला सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणाची तळमळ लागते.! आपल्या मनातील अशुद्धता काढुन टाकतो.विमलता मिळवतो..!त्यामुळे मुखावर तेजस्वी प्रभा निर्माण होते. ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा होते.त्यामुळे तेजस्वी बुद्धिमत्ता प्राप्त करून घेतो.त्याला अभिमुखी ज्ञान म्हंटले आहे.त्या ज्ञानाने अंत:करणातअगाध करूणा निर्माण होते. परोपकार ,सहनशिलता, शांतता, प्रज्ञा याची जोपासना होते. त्यामुळे जो तो गोष्ट करेल ती ती यशस्वी होतेच..!.या उपलब्धतेमुळे तो कालातीत होतो. सर्व शास्त्रे आणि दिशा जिंकल्याने साधुमती अवस्थेत दिव्य दृष्टी प्राप्त करून तो बुद्ध होतो…!
पारमिती म्हणजे एका अवस्थेची परिपूर्णता असते. परीपुर्ती असते. तथागत गौतम बुद्धाने धम्मचक्र प्रवर्ततीत करताना पहिल्या पाच भिक्कूना “दहा पारमिता” साग॔तल्याआहेत.
संत रविदासजीची आपण चिकित्सा केली तर संत रविदासजी या पारमितावरून बुद्ध कसे आहेत हे शोधता येते…!
1) शील:
सदाचारी वर्तन चारित्र्यवान म्हणजे शील.!मानवाचे जीवन हे सदाचारी हवे. प्राण्यांवर प्रेम करणे. खोटे न बोलणे.परस्त्री मातेसमान मानणे व वागणे.परधन मातीसमान मानणे. कष्ट करणे.चोरी न करणे नशा न करणे. भक्ति करणे.दान करणे.मदत करणे.सेवा करणे.संत संगती करणे….शुद्ध चारित्र्य हेच शुद्ध मन.रविदास महाराज आपल्या खालील दोह्यात सांगतात…
सत संतोष अरू सदाचार, जीवन को आधार!
रविदास भये नर देवते, जिन तिआगे पंच विकार!!
ज्यांनी शारीरिक इंद्रियावर, पंच विकारांवर जय मिळविला आहे तो, शीलवान असा , नर देवा सारखा असतो.
(जितेंद्रिय देवपदी जातो )
2)दान..
दिन दुखी के हित जो वारे अपने प्राण!
रविदास उह नर सुर को सच्चा क्षेत्री जान!!
रविदास महाराजाना उपाशी माणसं बघवत नसायची..! लंगर मराठीत ज्याला भंडारा म्हणजेच अन्नदान म्हणतात. गोरगरिबांना मोफत जेवण देण्याची लंगर परंपरा जगात सर्व प्रथम त्यांनीच चालू केली आहे.ते जिथे जात तिथे चोवीस तास चूल पेटलेली असायची.तिथे कोणीही उपाशी रहात नसे.कोणी उपाशी नाही हे पाहून मगच,ते जेवायचे..! ज्ञानदान,सेवादान धनदान ही संत सुलक्षणं आहेत… !
गोरगरिबांच्या सेवेत जो प्राण ही देईल तो खरा क्षत्रिय असे गुरूजी म्हणतात..!तसे वागतात..!
3) उपेक्षा: उपेक्षा म्हणजे अनासक्ति..! गुरू रविदासानी धनसंचय कधीच केले नव्हते. मठ, आश्रम,पिठ बांधले नाहीत. गटई ,चर्म व्यवसाय करताना ग्राहकाना स्वताहून दाम कधीच मागितले नव्हते.जे देतील ते आपल्या “कटौती” मध्ये ठेवा.असे ग्राहकांना विनंती करीत…!अनेक सिद्ध महा
पुरूषांनी त्यांना हिरे, रत्ने, मोहरे सोने,पारस, भेट दिले होते.ते कधीही त्यांनी स्विकारले नव्हते. माझ्याकडे रामधन असताना.याची काय जरूरी.? म्हणून जरूरी पुरते जगण्यावश्यक तेवढेच ते वापरायचे बाकीचे गरीबांना गरजूंना वाटायचे…!
धन संचय दुख देत है,धन त्यागे सुख होय!
धन संचय दुख खान है,रविदास समुझि मन मंहि!!
4)नैष्कम्य..
नैष्कम्य म्हणजे भोगवृत्तीचा त्याग. शारिरीक सहा इंद्रिय सुखसंवेदनांचा त्याग. या भोगाना ते माया म्हणतात . भौतिक वस्तूंची अनासक्ति… त्यागी प्रवृत्ती…! कदाचित एखादी वस्तु मिळाली तर,हुरळून जाणे नाही.,नाही मिळाली तर दु:खी होणे नाही.तटस्थ वृत्ती…!ही वृत्ती गूरू रविदासानी जोपासली होती…!
जो बस राखे इंद्रिया ,सुख दुख समझि समान!
सोड अमरित पद पाइगो ,कहि रविदास बखान !!
5)विर्य..
विर्याचा अर्थ पुरुषार्थ,त्या पुरूषार्थाने महत्प्रयत्न करणे..!स्वताच्या कष्टावर श्रद्धा असणे.. घेतलेले कार्य तडीस नेणे.मानसिक व शारीरिक आत्मबळ कमावणे.गुरू महाराजानी आयुष्यभर जनसेवा देश सेवा ह्यास आपला धर्म समजून कर्म कांड, अज्ञान,विषमता, अन्यायाचा विरोधात लढले व जिंकले…!त्यामुळे तत्कालीन 52 राजे त्यांचे शिष्य झाले होते…!
धर्म हेत संग्राम महं ,जौ कउ कटाए सीस!
सो जीवन सफल भया ,रविदास मिलंही जगदिस !!
6)शांती..
हिंसेला अहिंसेने जिंकणे. गर्व न करणे.क्रोध, द्वेष ,सुड भावना नसणे. क्षमावान चिंता मुक्त निर्मळ मन म्हणजे शांती…! मनास त्यासाठी नेहमी सहजसत्य अवस्थेत ठेवले पाहिजे.असे सुचवतात.
रविदास सदाहि राखिए ,मन मंहि सहज सभाओ!
राखी नहि कुपंथ पग, जौ लौरो सुख चाओ!!
7)सत्य..
सत ईश कहू रूप है,सत सक्ती अत अपार!
रविदास सत्त कूं धारणा , देइहि पाप निवार!!
सत्य इश्वराचे स्वरूप आहे.सत्यात अपार शक्ति आहे. सत्याने पापाचा नाश होतो…रविदास महाराजांनी सत्यालाच ईश्वर मानलेले आहे.
कितीही कटु असले तरी सत्य स्वीकारणे.हे शास्त्र,विज्ञान आहे..! असत्य न बोलणे आणि सत्यासाठी सत्याग्रहाचा मानव कल्याणासाठी प्रचार करणे हे संत कार्य आहे…गुरू रविदासानी ते कार्य अविरत पणे केलेले आहे…!
8)अधिष्ठान…
संत रविदासाचे सत्याची प्रतिष्ठापणा करणे हेच ध्येय होते..!.आपल्या ध्येयाप्रती ते दृढ निश्चयी दृढसंकल्पी होते. ते कधीही कुठेही विचलित झाले नव्हते.अनेक वाद विवाद धर्म सभा त्यांनी जिंकून मनूवेद आणि जन वेदना लोकांना पटवून सांगितल्या (त्यामुळे त्यांच्या नावावर अनेक चमत्कार अख्यायिका पसरलेल्या आहेत..!)
9) करूणा:..
करूणा मानवी मनाचा अलंकार आहे..! सजीव, अबोल प्राण्या प्रतीअसलेला दयाभाव आहे. क्षमा भाव आहे. आपलेपणा आहे.प्रेम आहे.निसर्ग संबंध आहे.!
रविदास जीव कूं मारि कर कैसो मिलंही खुदाय!
पीर पैगंबर औलिया,कोऊ न कहइ समुझाय!!
दया धर्म जिन्ह मे हिरदै पाप को कीच!
रविदास तिन्हहि जानि हो .महापातकी नीच!!
सो कहा जानै पीर पराई!
जाके दिलमें दरद न आई!!
तथागत गौतम बुद्धाला करूणा सागर , म्हंटले जाते., तसे संत रविदास हे प्रेम पर्वत आहेत. नवस जत्रेत प्राणी हत्या करू नये.बळी देऊ नका. ते करूणामय प्रेमळ मनालाच “मनचंगा” म्हणतात.रविदास महाराज शुद्ध बुद्ध आहेत .
10) मैत्री…
रविदास महाराज हर जीवाचे मित्र होते…पशु ,पक्षी,वृक्ष वल्लरींचे मन वाचणारे ते संत होते.
पर पिडा अति अधम वषानी, परंहित सरिस धरम नहीं आनि!
पर निंदा सम नहीं अधमाइ, कहि रैदास मुनि सब गाई!!
या दोह्यात ते परपिडा , पर निंदा यासारखा दुसरा अधम नाही वैर धरू नका. परहिता सारखा दूसरा धर्म नाही.हे कळकळीने सांगतात. भाषा ,देश, वर्ण, रंगाची सिमा मैत्रयाला बंदिस्त करू शकत नाही.. मैत्रीने दुःख संपेल.अशी त्यांची धारणा होती..!
या दहा पारमिता संत रविदासानी पार केल्या होत्या म्हणून ते भगवान गौतम बुदधाच्या विचाराचे शुद्ध बुद्ध आहेत असे वाटते.(हा माझा खाजगी कयास आहे .चुक असल्यास क्षमा असावी.) ह्या रविदासी विचाराने व कृतीने
आपण ही बुद्ध होऊ शकतो.
नमो बुद्धाय नमो रविदासाय…!
लेखक अँड आनंद गवळी. पुणे.
राष्ट्रीय चर्मकार महासंघ ,राष्ट्रीय उपाध्यक्ष..
भारतीय दलित साहित्य अकादमी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष.
संत रविदास (म.रा.)पुरस्कार 2018
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत