अंत्योदय लाभार्थींची क्रूर थट्टा.. फाटक्या टाकाऊ साड्या आणि देशाचा अपमान करणाऱ्या पिशव्यांची संतप्त नागरिकांकडून होळी .

परभणी: मणिपूर मध्ये महिलांची नग्न धिंड काढणाऱ्या वर कसलीही कडक कारवाई न करणारे आता स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत प्रत्येक अंत्योदय लाभार्थी महिलांना साड्यांचे वाटप करत आहेत. या साड्या टाकाऊ, फाटक्या आणि अतिशय निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप संतप्त महिलांनी केला आहे.
सरकारकडून रेशन दुकानामार्फत दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील महिलांना नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेल्या पिशव्यांमधून साडी आणि मोफत धान्य देण्यात येत आहे. मात्र फाटक्या साड्या दिल्याचा आरोप करत परभणीतील पाथरी तालुक्यातील कान्सुर गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर या साड्याची तसेच पिशव्याची होळी करण्यात आली. पिशव्यांवर मोदींचा फोटो मोठा आणि भारत सरकारचा लोगो लहान छापण्यात आला आहे यावर ही सुज्ञ नागरिकानी तीव्र विरोध दर्शविला आहे.
स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत प्रत्येक अंत्योदय लाभार्थी महिलांना साड्यांचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, या साड्या फाटक्या आणि निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना रेशन दुकानातून आनंदाचा शिधासोबत साडी देण्यात येत आहे. मात्र या साड्या जुन्या वापरलेल्या तसेच फाटक्या असल्याचा आरोप केला जात आहे. परभणी तसेच यवतमाळ जिल्ह्यातून फाटक्या साड्या दिल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
राज्याच्या वस्त्रोद्योग संचालनालयाने राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारकांना साडी वाटपाचा निर्णय घेतला होता. दारिद्य रेषेखालील महिलांना वर्षातून एकदा साडी वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य यंत्रमाग महामंडळ ही योजना राबवत आहे. या योजनेसाठी राज्य सरकार महामंडळाला साड्यांचे उत्पादन, जाहिरात, वाहतूक खर्च, साठवणूक, हमालीसाठी खर्च देणार आहे. तर २०२३-२४ या वर्षाकरिता महामंडळास एका साडीसाठी ३५५ रुपये दिले आहेत. मात्र यामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाच्या साड्या वाटप करून मोठा भ्रष्टाचार केला जात असल्याची शंका सामान्य रेशन धारकांनी व्यक्त केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत