भारतीय बौद्ध महासभा तालुका अक्कलकोट च्या वतीने हसापुर येथे पाच दिवसीय महिला उपासीका शिबिराचे आयोजन.

अक्कलकोट : भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा महिला कार्यकारणी यांनी प्रथमच अक्कलकोट तालुक्यातील हसापूर येथे दिनांक ८ ते १२ मार्च असे पाच दिवसीय महिला उपासीका शिबिर आयोजित केलेले आले.
महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शारदाताई गजभिये महिला महाराष्ट्र संघटक, निर्मलाताई कांबळे जिल्हाध्यक्ष महिला विभाग महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा अध्यक्ष आण्णासाहेब वाघमारे, अक्कलकोट तालुकाध्यक्ष मरेप्पा शिवशरण, सरचिटणीस साहिल कांबळे, उपाध्यक्ष महिला विभाग पूजा घटकांबळे, सचिव प्रीती जैनजांगडे व दिक्षा गायकवाड आदीच्या हस्ते करण्यात आले.
त्रिसरण पंचशील घेऊन, आदर्शंना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
हे पाच दिवस दररोज वेगवेगळ्या धम्म विषयांवर महिलांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शनिवारी शिबिरामधील प्रवचनाचा विषय बुद्ध आणि धम्म भाग 2 हा निर्मलाताई कांबळे यांनी घेतला तर बौद्ध धम्माचे सार असलेला आर्य अष्टांगिक मार्ग हा महत्त्वाचा भाग शारदाताई गजभिये यांनी घेतला.
याप्रसंगी हसापूर गावचे ग्रा.सदस्या सावित्रीबाई घटकांबळे, प्रीती घटकांबळे,नेहा घटकांबळे,कविता धसाडे,संध्याराणी कांबळे, कृष्णाबाई घटकांबळे,संपता घटकांबळे, श्रीदेवी घटकांबळे, लक्ष्मी घटकांबळे, सुषमा किरगल, दीक्षा गवळी, प्रज्ञा सोनकांबळे, मायावती शिंगे
तालुका पदाधिकारी गंगाराम वाघमारे,
प्रताप घटकांबळे,दिनेश गवळी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती हसापूरअध्यक्ष अंबादास घटकांबळे,बाबू थंब, आदीसह बौद्ध उपासिका विद्यार्थी उपासक व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत