आयु. राजेंद्र कसबे यांनी आपल्या जीवनामध्ये गौतम बुध्दाच्या शिकवणुकीचा स्वीकार करून व्यसनाधिनतेपासून कायमची मुक्ती मिळवली !

आयु. राजेंद्र कसबे यांना दैनिक जागृत भारत च्या वतीने सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा…!
मुंबई : दिनांक 09/03/2024 रोजी मातोश्री रमाई उत्कर्ष संघ मंडळ चेंबूर मुंबई येथे सायंकाळी 07.30 वाजता,आमचे ज्येष्ठ बंधू राजेंद्र कसबे यांच्या सेवानिवृत्तीच्या औचित्याने सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वास्तविक पाहता राजेंद्र कसबे यांचा सम्मान सोहळा हा खरं तर सेवानिवृत्ती मुळेच होता असे नाही तर राजेंद्र कसबे यांनी आपल्या जीवनामध्ये गौतम बुध्दाच्या शिकवणुकीचा स्वीकार करून व्यसनाधिनते पासून अलिप्त होऊन उत्तम प्रकारे वैवाहिक जबाबदाऱ्या पार पाडत धम्म कार्यात रममान झाले आहेत. या मंगल प्रसंगी त्यांच्या या क्रांतीकारी परिवर्तनाचे स्वागत सर्वांनी भरभरून केले.
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूज्य भंते प्रज्ञाबोधी यांची प्रमुख उपस्थिती होती.तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून प्रा. आशालता कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून अमोल मडामे,धम्मचारी बोधीसेन, लेखक विजय अशोक बनसोडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे आणि विचारांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वैशाली विजय खैरनार, संगीता गायकवाड, बाळकृष्ण तांबे, चोकर मावशी, धम्मदीप कांबळे, दीपक चौगुले, बाजीराव कांबळे, सृष्टी कसबे यांनी राजेंद्र कसबे यांना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अमोल मडामे, धम्मचारी बोधिसेन, लेखक विजय अशोक बनसोडे यांनीही कसबे यांना शुभेच्छा देऊन समायोजित मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्राध्यापक आशालाता कांबळे यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले आणि शेवटी पूज्य भन्ते प्रज्ञाबोधी यांनी धम्मदेसना देऊन कसबे यांना शुभेच्छा दिल्या. तर यावेळी विविध जिल्ह्यातून आलेल्या नातेवाईकांसह निमंत्रित पाहुणे, मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत