मातृसत्ताक गणव्यवस्थेमध्ये राज्य हे मातृवंशक गण संघाचे होते..

सुधाकर सरवदे
अंबरनाथ ( पूर्व
आपले पुर्वज मातृसत्ताक ,मातृवंशक गणसंघाचे होते.स्री गणराज्य व्यवस्थेमध्ये गणमाता असत. गणधन ,गणशेतीचे सर्वांना समान वाटप होई .पितृसत्ताक व्यवस्थेने स्रीला क्षुद्र वर्णात टाकले.मातृसत्ताक गणव्यवस्थेने आयुर्वेदाचा शोध लावला.हळदीचा औषध म्हणूनप्रथम उपयोग सुरु केला.आधुनिक शेतीचा शोध देखील भारतीय गणमातांनी लावला.
विवाहप्रसंगी मातृकुळ,मामाचे कुळ पाहिले जाई.
आई,मावशी ,बहीण,आजी, मामा आणि भाऊ ,स्री गणव्यवथ्येचे गणवीर असत.आजही ब-याच विवाहप्रसंगी मातृकुळ पाहीले जाते.
मुलांची नावेही मातृकुल दर्शक ठेवली जात.
उदा: शिवाई वरून शिवाजी महाराज,माता गौतमी वरुन सिद्धार्थ गौतम,माता भिमाबाई,भिमाई वरुन भिमराव आंबेडकर.
सिंधू नदीच्या खो-यात गणमाता निरुती
यमुना नदीच्या खो-यात गणमाता उर्वशी
नर्मदा नदीच्या खो-यात गणमाता ताटीका
गोदावरी नदीच्या खो-यात गणमाता शुर्पनखा
भिमा नदीच्या खो-यात गणमाता मावळाई
पंचगंगा नदीच्या खो-यात गणमाता अंबाबाई
तेरणा,मांजरा नदीच्या खो-यात गणमाता तुळजाई
आज जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देताना,महिला वैचारीक गुलाम होऊ नयेत म्हणून काळजी घ्यावी लागेल.गुलामी विचाराचे संस्कार झाल्याने गुलामी स्वभावाची पिढी जन्मास येते .त्या पिढीत गुलामी स्वभाव विकसीत होतो.
त्या साठी विज्ञाननिष्ठ शिक्षण महत्वाचे.
Education make man perfect.
माता यशोधरा,राष्ट्माता राजमाता जिजाऊ मांसाहेब,क्रांतीज्योती माता सावित्रीमाई, माता ताराराणी,माता अहिल्याबाई होळकर, माता रमाई, माता फातीमा बेग .या आणि अशा राष्ट्र मातांना ,ज्यांनी इतिहास घडवला.लढल्या,लढणायाचे बळ दिले,त्या सर्व राष्ट्र मातांना विनम्र अभिवादन.
……….सुधाकर सरवदे
अंबरनाथ ( पूर्व
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत