सरकार बदलण्याची ताकत असलेल्या शेतकऱ्याने सरकारकडे मागत बसू नये – नाना पाटेकर

शेतकऱ्यांची खस्ता हालत असताना दुर्लक्ष करणाऱ्या सरकार कडे कांहीं मागण्यापेक्षा आपल्या मर्जीचे सरकार आणण्यासाठी शेतकऱ्यांनी का प्रयत्न करू नये असा संतप्त सवाल ज्येष्ठ रंगकर्मी नाना पाटेकर यांनी उपस्थित केला. सोन्याचा भाव कित्येक पटीने वाढला पण गहू तांदूळ याला भाव का येत नाही असा वास्तवाला धरून प्रश्न त्यांनी विचारला. अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात ये बोलत होते.
शेतकरी हा जनावरांची भाषा सुध्दा उत्तम जाणतो पण शेतकऱ्यांची भाषा राज्यकर्त्यांना का समजत नसेल असा मार्मिक टोलाही त्यांनी सरकारला लगावला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत