वेरूळ येथील किरणोत्सवाचे साक्षीदार होऊया..

नमस्कार, वेरुळ म्हंटले की कैलास लेणी हे सर्वपरिचित समीकरण आहे, याखेरीस अजून वेरुळ लेण्या, त्यातील शिल्प यांच्या बाबतही आपण परिचित असाल, आज मात्र एका नव्या आणि गेल्या 8 वर्षांपासून अभ्यासकांची पावले वेरुळ कडे वळावी, इतिहास अभ्यासकच नाही तर खगोल अभ्यासकांना आपुलकीचा वाटावा असा नवा विषय आम्ही मांडतोय. वेरुळ येथील 10 क्रमांकाचे लेणे चैत्यगृह आहे यातील तथागतांचे भव्य शिल्प चेहऱ्यावरील भाव आणि लेणी परिसरातील वातावरण मनःशांती देणारे आहे.दरवरषी लेणी क्र 10 च्या लेणीत 10 मार्च 11 मार्च या दिवशी 4.30 ते 5.15 च्या दरम्यान चैत्यगृहाच्या समोरील झरोक्यातून सूर्याची किरणे भगवान बुद्धाच्या चेहऱ्यावर येऊन प्रकाशमान होतात ही तेजाची तेजाशी भेट आहे. याचे साक्षीदार आपण होऊ शकाल. हा सोहळा नक्की अनुभवा वेरुळच्या या किरणोत्सवाचे साक्षीदार व्हा.
डाॅ. संजय पाईकराव, सचिव, मुर्ती व शिल्प संशोधन संस्था,
छत्रपती संभाजीनगर .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत