आंतरराष्ट्रीय माहितीपट “चैत्यभूमी” चे TISS तुळजापूर येथे प्रदर्शन..!


तुळजापूर : दि.2/03/2024 रोजी टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथे बहुचर्चित चैत्यभूमी माहितीपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले.
आता पर्यंत ह्या माहितीपटाचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, स्टॅंडफोर्ड युनिव्हर्सिटी, कोलंबीया युनिव्हर्सिटी अश्या जगविख्यात आणि त्याचसोबत भारतातील नॅशनल फिल्म अर्चिव्ह ऑफ इंडिया, एफ. टी.आय. आय.पुणे, आय. आय. टी.बॉम्बे, इंडिया इंटरनॅशनल सेंटर दिल्ली, बेंगलोर इंटरनॅशनल सेंटर बेंगलोर अश्या प्रतिष्ठित विद्यापीठामध्ये सादरीकरण करण्यात आले,आणि याच अनुषंगाने काल आंबेडकर स्मृती व्याख्यान्माला टीस तुळजापूर आयोजित चैत्याभूमी माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित चैत्याभूमी माहितीपटाचे दिग्दर्शक मा.सोमनाथ वाघमारे( पी. एच. डी. स्कॉलर टीस मुंबई) यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना माहितीपटा बद्दल मार्गदर्शन केल व त्यांचे सहकारी सागर साखरे, शुभकरम सिंग,यांनी देखील ह्या माहितीपटामध्ये आपल योगदान दिल आहे.
ह्या माहितीपटातून परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापनिर्वाण दिनानिमित्त कोणतेही निमंत्रण न देता मुंबई मध्ये लाखो चा जनसमुदाय आपल्या उद्धारकर्त्याला अभिवादन करायला येत असतो आणि कश्या पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपातून बाबासाहेबांचा वारसा लोक पुढे घेऊन जात आहेत आणि 6 डिसेम्बर च्या दरम्यान तिथे येणाऱ्या आंबेडकरी समुदायाप्रति तेथील अभिजन वर्गाचा काय दृष्टीकोन आहे ह्या सगळ्या विषयाबद्दलच्या ओरिजिनल दस्तऐवजाच प्रदर्शन ह्या माहितीपटातून करण्यात आलं आहे.
कार्यक्रमाला संस्थेमधील विध्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला व तसेच आसपासच्या गावातील युवक मंडळी व स्थानिक भागातील फुले -शाहू -आंबेडकरी चळवळीतील लोक प्रदर्शन स्थळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप “आंबेडकर स्मृती व्याख्यान्माला चे संयोजक डॉ. गजानन हिवाळे यांच्या वतीने करण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत