संत शिरोमणी गुरु रविदास जी महाराज लेख शृंखला – 7

गुरू रविदास जयंती निमित्त पुष्प ..7
गुरू रविदास जयंती निमित्ताने लिहत असलेल्या गुरू अमृत वाणीचा भावार्थ वाचून एका बांधवाने मला फोन करून विचारले, भाऊ संत रविदासानी इतके दोहे लिहलेले आहेत.तर त्यांनी सज्जनाला दुर्जन आणि दुर्जनाला सज्जन म्हणारया ढोंगी हरिभक्ता बद्धल काही लिहले आहे का? मला पदावल्या तोंडपाठ नाहीत. संग्रही जे काही साहित्य आहे. त्याचा भावार्थ माझ्या परिनो लिहतो. नवनवीन माहितीचे स्वागतच असते….! आनंद आहे कि समाज माध्यमातून ते वाचले जाते..असो.
रविदास सोइ साधु भलो,जऊ रहइ सदा निरबैर!
सुखदाई समता गहइ,सभनह मांगहि खैर!!
रविदास महाराज सज्जन व्यक्तीला साधू संबोधतात.सज्जन व्यक्ती असा असतो कि,तो कुणाला ही विरोध करून वैर निर्माण करत नाही.साधू समतावादी , सुख देणारा सर्वाचे कल्याण चिंतणारा असतो. सज्जनाला परपिडा समजते.त्यामळे तो बैचेन होतो.ती पिडा स्वता:वर ओढून घेऊन तो ते दु:ख दूर करतो .अशी माणसं परोपकारी प्रेमळ, स्वावलंबी ,कष्टाळू ,निष्कपट असतात.त्यांना कसलाही अभिमान नसतो. ह्या उलटगुण असणारा तोतया मनोविकृत स्वताःला हरिभक्त म्हणवून घेणारा .ढोंग सोंग घेणारा साधूचा मनात इळस करतो.त्यामळेच कदाचित चांगला माणूस राजकारणात रमत नाही.चांगला लेखक नावाजला जात नाही.सत्याला पुजत नाहीत…!ह्याला कारणीभुत वाघाचे कातडे पांघरणारणारे आभासी वाघ आहेत..
रविदास तू कांवच फली ,तुझे न छीवै न कोय!
तै निज नांव न जानियां ,भला कहां ते होय !!
रविदास महाराज अश्या वाघांना
कांवच फली म्हणजे खाज खुजलीच्या शेंगा म्हंटले आहे. खाजखुजलीच्या पानाने / शेंगाने स्पर्श केल्यावर अंगावर खाज सुटून पुरळ उठतात.अश्या माणसाला कोण शिवणार ?…खुजली करणारयांचा लोक मनापासून तिरस्कार करतात. अश्या तिरस्कृत नकली हरिभक्तांचे कल्याण कसे होणार? ते “नर जमपुर जाहिंगे ” म्हणजे यमपुरी जातात असा दाखला महाराजानी दिलेला आहे.!.देवाचे नाव घेऊन बकरीचा सुरीने हळू हळू गळा कापणारयांच्या मनात सज्जन भाव कसा असणार?त्या मनात मत्सराचा सारा चिखल भरलेला असतो. .असे तोतये नीच आहेत.जे पंचविकारमुक्त उच्च महापुरूष वंदनिय असतात…!
लेखक,ॲड.आनंद गवळी
राष्ट्रीय चर्मकार महासंघ
राष्ट्रीय उपाध्यक्ष.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत