नागपूर दिक्षा भूमीवर समता सैनिक दलाचे 5 हजार जवान सेवा देणार-एस के भंडारे

मुंबई – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोका विजयादशमी दिनी दि 14/10/1956 रोजी लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दिक्षा देऊन हिंदू धर्माच्या गुलामीतून बाहेर काढून स्वाभिमान दिला. ती ऐतिहासिक दिक्षा भूमी भय्यासाहेब आंबेडकर यांनी आमदार असताना सरकारकडून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या नावे मिळवली होती, सरकारी अधिकाऱ्यांनी ती संस्थेच्या नावे केलेली नाही. ज्या स्मारक समितीकडे आहे त्यांनी मनुवादयाशी हात मिळवणी करून दिक्षा भूमीवर सुशोभीकरणाच्या नावाखाली उंडर ग्राउंड पार्किंग करण्याचा डाव डॉ भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दि बुद्धिस्ट सोसायटी /समता सैनिक दल व समाजाच्या विविध संघटना, संस्था व आंबेडकरी जनतेने उधळून लावला त्याबद्दल अभिनंदन करून येणाऱ्या 68 व्या धम्म दिक्षा समारोह कार्यक्रमासाठी येणाऱ्या आंबेडकरी जनतेची व दिक्षा भूमीची सुरक्षा सेवा दि 11/10/2024 ते दि 12/10/2024 रोजी समता सैनिक दलाचे 5 हजार अधिकारी, सैनिक करतील असे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया /समता सैनिक दलाची दि 6/10/2024 रोजी सायंकाळी आयोजित महत्वपूर्ण ऑनलाईन बैठकीत चर्चे अंती जाहीर केले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व समता सैनिक दलाचे असि. स्टाफ ऑफिसर भिकाजी कांबळे होते. बैठकीचे आयोजन व सूत्रसंचालन राष्ट्रीय संघटक इंजि. पद्माकर गणवीर (नागपूर ) यांनी केले.
या बैठकीस संस्थेचे राज्य संघटक अनुक्रमे भीमराव फुसे(नागपूर ),विजयकुमार चौरपगार(अमरावती ), अशोक घोटेकर (चंद्रपूर ) आणि विदर्भातील सर्व जिल्हा शाखा यांनी सहभाग घेतला. या बैठकीत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.
1) विदर्भातील प्रत्येक जिल्हा शाखेने कमीत कमी 20 हजार धम्मदान देणे. त्यात प्रामुख्याने प्रत्येक जिल्हा /तालुका पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, बौद्धाचार्य, माजी श्रामणेर यांनी रु 1000/- द्यावे.त्यासाठी नागपूर महानगर जिल्हा शाखेच्या खात्यावर रक्कम जमा करावी.जे धम्मदान देतील त्यांची जिल्हा निहाय माहिती प्रसिद्ध केली जाईल.
2) दि, 11/10/2024 रोजी सकाळी 8.00 वा ते दि 12/10/2024 रात्री 10 पर्यंत सर्व पुरुष अधिकारी/ सैनिक यांनी सेवा द्यायची.
3)आणि दि 12/10/2024 रोजी सकाळी 8.00 वा.सर्व महिला अधिकारी /सैनिक यांनी
सेवा द्यायची आहे.
4) सर्व पदाधिकारी व दलाचे अधिकारी /सैनिक यांनी दलाच्या ड्रेसवर ड्युटी वाटप ऑफिस (समाज कल्याण कार्यालय मैदान, नागपूर दीक्षाभूमी )येथे आपल्या यादीसह उपस्थित रहावे.
5) नागपूर दिक्षा भूमी वर अभिवादन व सेवा देण्यासाठी येणारे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सर्व केंद्रीय, राज्य, जिल्हा पदाधिकारी, ज्यांनी समता सैनिक दलाचे शिबीर केलेले आहे त्यांनी समता सैनिक दलाच्या ड्रेस वर अभिवादन करावे व दिक्षा भूमीवर सेवा दयावी.
6) नागपूर दिक्षा भूमीवरील समता सैनिक दलाची मानवंदना, महासंचालन रॅली, सभा इत्यादी सर्व कार्यक्रमास समता सैनिक दलासह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव य. आंबेडकर (ट्रस्टी /राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष, समता सैनिक दल ) हे उपस्थित रहातील. असे निर्णय /ठराव करण्यात आले.
आभार प्रदर्शन नागपूर महानगर जिल्हा अध्यक्ष जे आर गोडबोले यांनी केले.यां बैठकीत विदर्भातील सर्व जिल्हा पदाधिकारी, समता सैनिक दलाचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत