अवकाळी पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील बळीराजा त्रस्त..

बुलढाणा जिल्ह्यात खामगाव व इतर ठिकाणी काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू कांद्यासह इतर बागायती पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यात कांहीं भाग व त्यासह सह इतर परिसरात काल रात्री मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली, अचानक झालेल्या या वातावरणातील बदलामुळे बळीराजा हैराण झाला असून डोळ्यादेखत उभ्या पिकांचं नुकसान पहावं लागतं आहे.
खामगाव तालुक्यातल्या ग्रामीण भागांमध्ये कांदा, हरभरा सह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून तात्काळ पंचनामे करून शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत