महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महामंडळाना 305 कोटी रुपयांचा निधी मंजूर.

महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध महामंडळांसाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने ३०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
यामध्ये प्रामुख्याने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाचा समावेश आहे.
यासंदर्भात राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने केंद्र शासनाला पाठवलेल्या प्रस्तावावर नुकत्याच झालेल्या बैठकीत निर्णय होऊन केंद्र सरकारच्या वतीने हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत