मराठा आरक्षण संदर्भातील सर्वेक्षण अहवाल महाराष्ट्र राज्य सरकारला सादर

मुंबई : आज येथे मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा अहवाल आज राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी महाराष्ट्र राज्य सरकारला सदर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यांयमंत्नारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अहवाल सुपूर्द करण्यात आला . मराठा समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थिती तपासण्यासाठी राज्यभरात सर्वेक्षण करण्यात आलं होतं. सुमारे साडेतीन ते चार लाख कर्मचारी यासाठी काम करीत होते. हा अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी मांडण्यात येईल, तसंच या करता येत्या २० फेब्रुवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावलं असल्याचं यावेळी नमूद करण्सांयात आलं. कायद्याच्या चौकटीत बसणारं तसंच ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू न देता मराठा समाजाला आरक्षण देता येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळे मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन मागे घ्यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत