जरांगेच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस

१४ फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षण आणि सगेसोयऱ्यांसंदर्भातील कायद्यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात असल्याचे पाहायला मिळते. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसल्यापासून ना अन्न ना पाणी ग्रहण केले आहे. त्यामुळे त्यांची तब्येत गंभीर होताना दिसतेय. अशातच त्यांच्या नाकातूनही आता रक्तस्त्राव होत असल्याची माहिती मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती गंभीर असूनही त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला. डॉक्टरांचं पथक अंतरवाली सराटीतील उपोषण स्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी नाडी आणि बीपी तपासणी करण्याचा प्रयत्न केला पण याला जरांगे पाटील यांनी नकार दिला आहे.
मराठा आरक्षण आणि सगेसोयऱ्यांसंदर्भातील कायद्यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहे. दरम्यान, काल मनोज जरांगेंनी सरकारवर हल्लाबोल केला. मात्र बीड जिल्ह्यातील नारायण गड संस्थानचे महंत मठाधिपती शिवाजी महाराज यांनी आणि संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलचे विनोद चावरे यांनी बळजबरीने सलाईन लावण्यास सांगितले आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत