संविधान धोक्यात आहे.. – शरद पवार.

( राहुल हंडोरे यांजकडून )
उल्हासनगर दि.13 : भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहेत, परंतु आज संविधान धोक्यात आले आहे. आपल्या हक्कावर अधिकारावर हल्ले व्हायला लागले आहेत. आज देशाला मजबूत संविधानाची गरज आहे असे उदगार राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उल्हासनगर.4 येथे संविधान हक्क परिषद आयोजित राज्यव्यापी येल्गार सभेत प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना काढले. अध्यक्षस्थानी सदामामा पाटील होते.
संविधान हक्क परिषदेच्या वतीने शिक्षणाच्या खाजगी करणाच्या शासन निर्णया विरोधात येल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी शरद पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जलमंत्री असतांना त्यांनी भाक्रानांगल धरणाची योजना अंमलात आणली त्यामुळे आज पंजाब हरियाणा येथील जमिनीला शेतीला पाणीपुरवठा होत आहे. केवळ पाणी पुरवठा करण्याचे उदिस्ट न ठेवता पाण्यापासून वीज निर्मिती करून जेथे विजपुरवठा होत नाही तेथे वीज मंडळ स्थापन करून प्रयेक राज्यात वीज कशी पोहचेल असा प्रयत्न केला होता. आजचा विजेचा झगमगाट ही बाबासाहेबांची देन आहे असे ही शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादीची तोफ म्हणून ओळखले जाणारे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आपल्या घणाघाती भाषणात म्हणाले की, ज्या बापाने 4-5 वेळा मंत्रिपदे दिली त्याच बापाला हुकूमशाहा म्हणण्या पर्यंत काहींची मजल गेली आहे. आज सर्वत्र कॉन्ट्रॅक्ट पद्धत आणि खाजगीकरण लागू होत आहे. नोकऱ्याच नाहीत तर आरक्षण मागून काय फायदा. लढाईत संख्या महत्वाची नसते लढायला कोण तयार आहे हे महत्वाचे आहे. छोटे सैन्य देखील मोठया सैन्याला पराभूत करू शकते हा इतिहास आहे. भीमा कोरेगावची लढाई हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.
जेष्ठ पत्रकार किरण सोनवणे यांनी भारतीय राज्य घटना आणि जगातील राज्य घटना यांची तुलना करून भारतीय राज्य घटना ही जगातील सर्व- श्रेष्ठ घटना असल्याचे उदाहरण देऊन स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भारतीय संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केला. सभेचे सूत्रसंचालन संविधान हक्क परिषदेचे सरचिटणीस पत्रकार अनिल अहिरे यांनी केले.
संविधान हक्क परिषदेचे अध्यक्ष माजी शिक्षण उप संचालक रामचंद्र जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका महागायिका निशाताई भगत, गायिका आशालता भगत यांनी पहाडी आवाजात भीमगिते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. येल्गार परिषदेच्या संयोजिका डॉ संजीवनी कांबळे, संविधान हक्क परिषदेचे सचिव प्रकाश जाधव, खजिनदार शंकर कांबळे यांनी अतिथिंचे स्वागत केले.
या प्रसंगी आर. पी. आय चे जेष्ठ नेते आण्णासाहेब रोकडे, राष्ट्रवादीचे सचिव धनंजय सुर्वे, कबीर गायकवाड, संविधान हक्क परिषदेचे प्रतिनिधी डॉ जाणू मानकर, राहुल हंडोरे आदि उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत