माता भीमाई आंबेडकर यांच्या जन्मदिनी त्यांना त्रिवार अभिवादन.-संघपाल गौरखेडे

जन्म:- १४ फेब्रुवारी १८५४; आंबेटेंभे, ता. मुरबाड. मृत्यू:- २० डिसेंबर १८९६.
भिमाई रामजि आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या आई व रामजी आंबेडकर यांच्या पत्नी होत्या. त्यांचे वडील लक्ष्मन मुरबाडकर हे आधी मराठा पलटणीत व नंतर १०६ सॅपर्स अँड मायनर्स मधे सुभेदार होते.
इ. स. १८६७ मधे वयाच्या १३ व्या वर्षी भीमाईचा विवाह १९ वर्षीय रामजी आंबेडकर यांच्याशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे झाला.
इ. स. १८६६ च्या सुमारास रामजी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. भीमाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते व ते इंग्रजी सैन्यात सुभेदार या पदावर होते.
रामजी व भीमाई या दामपत्यांना १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जिवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव ही तीन मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान व चौदावे अपत्य होते. रामजी ज्या पलटणीत होते ती पलटण इ. स. १८८८ मधे मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कुलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते. या काळात रामजी व भीमाईंच्या पोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी झाला. भीमराव हे रामजी आंबेडकर व भीमाई यांचे १४ वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नव ‘भिवा’ असे ठेवण्यात आले, तसेच त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे होते आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक, आर्थिक भेदभाव केला गेला. इ. स. १८९४ मधे सुभेदार रामजी आंबेडकर इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नौकरी वरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील ‘कॅम्प दापोली’ वस्तीत परिवारासह राहू लागले. इ. स. १८९६ मधे रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडली व सातारा येथे राहिले. या वर्षी त्यांनी कबीर पंथाची दिक्षा घेतली. २० डिसेंबर इ. स. १८९६ मधे मस्तकशूळ या आजाराने भीमाईचे निधन झाले. त्यावेळी भीमराव ५ वर्षांचे होते.
भीमाईंच्या सन्मानार्थ मातोश्री भीमाई आंबेडकर पुरस्कार दिला जातो.
माता भीमाई आंबेडकर यांच्या जन्मदिनी त्यांना त्रिवार अभिवादन.
संघपाल गौरखेडे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत