महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक
हिंदुस्थान म्हणुन मान्यता मिळवली तर बौद्धाना काय फरक पडणार आहे ?
सुनिल गायकवाड
बौद्धावर अत्याचार अन्याय होइल की त्यात वाढ होइल ?
काय व कसा फरक पडेल ?
संविधान बदलतील अशी भिती वाटते का ?
जातीयवाद फोफावेल ?
बौद्धांच्या नोकऱ्या जातील का ?
बौद्धांना जगणं मुश्किल होइल किंवा बौद्धांना हा देशच सोडुन जावे लागेल असे काही घडु शकते का ?
काय होइल ह्याची जास्त काळजी तर नाही करत आपण.
आपल्या समाजावर त्याचा काय परिणाम होइल ह्याबद्दल काही विचार मांडता येतील का ?
उत्तर –
जेव्हा बाबासाहेब आंबेडकर संविधान कमिटीचे मुख्य म्हणून संविधान लिहीत होते. तेव्हा त्यांना अनेक कलमावर विरोध होत असे. तेव्हा त्यावेळचे दिग्गज नेत्यांना अर्थात जवाहरलाल नेहरू. डॉ राजेंद्र प्रसाद, मौलाना कलाम, सरदार वल्लभभाई पटेल, याना बाबासाहेब आपल्या अभासक बुद्धीचातुर्याने त्यांना उत्तरे देऊन समजावीत असत. अक्षरशः वैचारिक भांडणे होत असत त्यांची. आणि आपले म्हणने पटवून देत असत. मग त्याला मान्यता मिळत असे.
पण त्या काळी या सर्व मुख्य नेत्यांच्या मागे सपोर्टर म्हणून ब्राह्मणी विचारधारा असणारे लोक होते. ते राजकारणात नसणारे पण हिंदूधर्माची धुरा सांभाळणारे अनेक दिग्गज असे लोक होते ज्यांना आपण जातीवादी म्हणू. आणि ज्यांचा विरोध करणे या बड्या नेत्यांनाही भारी पडत असे. उदाहरण : जसे की, आज सत्ता जरी बीजेपीची असेल, आणि मोदी जरी पंतप्रधान असतील, तसेच शाह जरी गृह मंत्री असतील तरी, या सर्वांवर अंकुश लावण्याची जी ताकत आहे. ती म्हणजे आरएसएस मधे आहे. अर्थात मोहन भागवत व तत्सम इतर अनेक. अर्थात आजही मोहन भागवत यांच्या विरोधात जाऊन मोदी काही करू शकत नाहीत.
त्यावेळच्या अशा हिंदू ब्राह्मणी विचारांच्या उचवर्णीय धर्मांध लोकांना हे संविधान तेव्हाही मान्य नव्हतेच. तर यांना इतकेच वाटत होते की, जाऊ दे ना. हे नेहरू गांधी, राजेंद्रप्रसाद हे शिकलेले इंगजी जाणणारे बोलणारे चांगले पुढारी आहेत. चांगली भाषणे करून लोकांना वळविणारे लोक आहेत. हे जे इंग्रज आमच्या धर्मावर गदा आणीत आहेत. जे इंग्रज महार मांग, ढोर, धनगर, लोहार कुंभार अशा मागास शूद्रांना शिक्षण देत आहेत. हुशार बनवीत आहेत. जे दलितांना मोठया हुद्याच्या मुद्यांच्या जागा व अधिकारच्या नोकऱ्या हे इंग्रज देत आहेत. जे शूद्रांना समतेची वागणूक द्यायला लावीत आहेत. त्यामुळे हे शुद्र भविष्यात ताकतवर बनण्याची शक्यता आहे. हे सगळं ज्या इंग्रजांमुळ होणार आहे. हे नेहरू गांधी त्या इंग्रजांना भारतातून हाकलीत आहेत ना? जाऊ दे कसलं संविधान बनवायचं ते बनवू दे या नेहरू गांधीला आणि ऐकू दे काय ऐकायचं बाबासाहेबांचं. शेवटी ते संविधान चालवणार राबविणार तर आपणच ना ? देश आम्हीच चालवणार असे त्यांचे मत त्यावेळी होते. या विचारसरणीने त्यावेळी ब्राह्मण बुद्धिजीवीकडून संविधान अडविले गेले नाही. अन्यथा काँग्रेसचे नेते त्यांना फार काही महान वाटत नव्हते. ब्रम्हणाच्या नजरेत तेव्हाही लहानच होते.
संविधान लागू झाल्यावर लगेच मागास जातींना त्या काळी फारसा फायदा झाला नाही. जे आरक्षण होते त्यातही जागा भरल्या जातच नसत. उमीदवार मिळाला नाही म्हणून त्या रिक्त ठेवल्या जात असत. मुद्दाम भरितच नसत. पण कालांतराने खूप कमी टक्केवारिने का होईना जागा भरल्या जाऊ लागल्या. मुले-मुली शिकू लागली. तरुण मुले कायद्याने आपले हक्क विचारू लागले. फाईली पुढे का जात नाहीत प्रश्न विचारू लागले. कायद्याचा हिसका दाखवू लागली. मागासवर्गीय शिकून मोठे होऊ लागले. शिकलेली मुले-मुली कॉलेजात प्रेम होऊन आंतरजातीय विवाह करू लागली. त्यामुळे जातीप्रथाना तडा जाऊ लागला. गावखेड्यात विरोध होई पण शहरात कुठे शोधनार? काय करणार? कोर्ट कायदा या मुलांना मान्यता देऊ लागले. या आणि अशा प्रकारची हिंदू धर्माची डोकेदुःखी मोठ्या प्रमाणात वाढू लागली. आणि आजचा बौद्ध आणि हिंदु धर्मातील गुलाम असलेले शुद्र यांची झपाट्याने प्रगती होऊ लागली. व ब्राह्मणी हिंदुधर्मीय दबदबा कमी होऊ लागला. ब्राह्मणांनाही पूजापाठ करून नव्हे तर कामकाज करून उदरनिर्वाह करण्याची पाळी येऊ लागली. त्यांना वाटलं होतं की, आणू द्या कसलेही संविधान शेवटी देश आम्हीच कसा चालवायचा ते चालवू. पण या संविधानातील अडचणी त्यांच्या समोर येवू लागल्या आत्ता त्यांना समजून आले. ते परेशान झाले. व आता काही तरी करावेच लागेल हे त्यांच्या लक्षात आले. लोकसभेत गेल्याशिवाय व सत्ता हातात आल्या शिवाय काही करता येणार नाही हे त्यांना समजले. आणि कालांताराने राजसत्ता मिळविण्यासाठी आधी जनसंघ व नंतर भाजपची स्थापना करण्यात आली.
ज्यांना धर्मवाद, जातीवाद हवा आहे त्यांच्या हे लक्षात आले की, प्रथम सत्ता आणून संसदेत गेलं पाहिजे. आणि त्या दिशेने ते चालू लागले. राजकीय सत्ता हातात आल्या नंतरच्या काळातील पहिला मुदा त्यांच्या पुढे आला की, ज्या काँग्रेस ने मागासवर्गाला थोडीफार मजबुती आणली आहे. ती काँग्रेस एक मोठी ताकत आहे. आणि ही काँग्रेसची ताकत मागासवर्गाला तारक ठरते आहे. जो पर्यंत या काँग्रेसला संपवत नाही तो पर्यंत, बौद्ध व मागास वर्गीयांचा आधार नष्ट होत नाही. म्हणून आधी काँग्रेस संपविली पाहजे नंतर बघू या मुस्लिम आणि शूद्रांना हे त्यांना समजले. त्या प्रमाणे त्यांनी प्रथम काँग्रेसला टार्गेट केले. आणि आज जवळ जवळ काँग्रेसला संपवले आहे. आता टक्कर देणारी कोणतीही बलाढ्य शक्ती त्यांच्या समोर नाही. (आता बाबासाहेबांचे मत आणि त्यांना कॉग्रेस ने दिलेला त्रास मला माहित आहे. कुणी जर म्हणत असतील की मी काँग्रेसची वाहवाह करीत आहे. तर असे मुळीच नाही. अर्धज्ञानी आणि अतिहुशार असे म्हणू शकतात. तो त्यांचा हक्क आहे. पण काँग्रेस मते मागण्यासाठी आणि सत्ता मिळविण्यासाठीच का होईना आमचे इतके नुकसान करीत नव्हती. जितके भाजप करित आहे करणार आहे.) आणि हे देशातील आमच्या मागासवर्गीय लोकांच्या लक्षात येत नाही. सर्व चर्मकार, मातंग बांधवांना पुन्हा आम्ही हिंदू म्हणण्यात गर्व वाटावा असे त्यांना देवधर्मच्या रिंगणात पुन्हा ओढून आणले आहे. बीजेपी ने आज देशात अशी परिस्थिती निर्माण केली आहे की, मुस्लिम आणि बौद्धांच्या मतांची त्याना गरजच नाही. सध्याच्या वोटिंग पहिल्या तर तुमच्या लगेच लक्षात येईल. आणि या हिंदू हिंदू करणाऱ्या जातिवाद्यांनी अनेक वेळा हिंदू दलित, दलित मुस्लीम, हिंदू मुस्लिम, चे वाद उफाळून येतील असे प्रयत्न केले. त्यातून प्रत्येक वेळी नाही पण काही वेळा ते यशस्वी झाले आहेत. आणि बौद्ध नाही पण हिंदुधर्मात जे पूर्वी शुद्र म्हणून जगत होते त्यांना पुन्हा हिंदू धर्माकडे, आकर्षित करण्यात ते यशस्वी झालेले आहेत यात शंका नाही. आज सगळे नामांकित न्यूज चॅनल वाले आज भारत देश म्हणायचं सोडून सर्रास हिंदुस्थान म्हणत आहेत. अर्थात त्यांना तसा हुकूम आहे. नाहीतर नोकरी जाते. आणि ईडी ला सामोरे जावे लागते.
लक्षात घ्यावे आज संविधानाच्या अडसारामुळे हिंदूंना तुम्हाला किंवा इत्तर मागास शूद्रांना त्रास देता येत नाही. कारण संविधानाप्रमाणे काही बाबी आमदार खासदार यांच्या अधिकारात आहेत. काही बाबी पोलीस न्यायाधीश यांच्या अधिकारात आहेत, तर काही बाबी अधिकार नगरपालिका व पत्रकारांच्या अधिकारात आहेत. त्यामुळे इथे हिंदूंना एकाधिकार किंवा हुकुमाने कुणावर राज्य करता येत नाही. म्हणून हे संविधान बदलणे त्यांच्यासाठी खुप गरजेचे झाले आहे. २०१४ ला जेव्हा बीजेपी निवडून आली. त्याच्या आठच दिवसात त्यांनी १२ लोकांची संविधान समीक्षा कमिटी बनविली आहे. आणि या कमिटीचे सर्व सदस्य आय.ए.स आहेत. आणि हे संविधानावर कसून अभ्यास करीत आहेत. हे सद्य सरकारला मारदर्शन करीत आहेत.
संविधान बदलतील तेव्हा ते दुसरे संविधान चलाखीने लिहतील. जसे की समता आणि समरसता या शब्दात गूढ दडलेले आहे. लेखक मोदी, योगी किंवा भागवत असतील. तसेच मामुली शाब्दिक बदल करायचे आहेत आणि लेखकाचे नाव फक्त बदलायचे आहे. फारसा बदलही करणार नाहीत. पण एका दलिताचे संविधान आम्ही मानतो आहोत हे त्यांचा अपमान धुवून निघेल. या देशातून बाबसाहेबांचे संविधान हे अयोग्य होते. हे सिद्ध करतील. दिल्लीचे संसदभवन २०२४ ला नष्ट करून नवीन संसद भवन बांधण्याचे काम सुरू आहे. म्हणजे संसदभवन नष्ट. त्याच्या समोरील बाबासाहेबांची मूर्ती नष्ट. आणि या देशातील बौद्धांचे मनोबल नष्ट होईल. काय करायचंय संविधान बदली करण्यासाठी काहीच नाही. काय होईल नवीन संविधान घोषित केल्यावर. फक्त बौद्ध आणि मुस्लिम वस्त्यांवर, पोलीस आणि मिलेक्टरी लावायची आहे. आणि जर ती घोषणा करायच्या चार तास आधी लावली तर हाक ना बोंब. गपगुमान सहन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. हो काही नेते गोळ्या झेलतील, काही आत्महत्या करतील, तर काही हत्या करतील. पण हे नगण्य तुरळक होईल. आणि दुसरे संविधान सहज लागू होईल.
जे आपले काही लोक म्हणतात की संविधांन बदलूच शकत नाही ते मूर्ख आहेत. स्वतःच्या घरातील आईबाप भाऊ मुले याचं ऐकत नसतात. आणि हे जगाला ज्ञान सांगायला निघालेले लोक असतात. संविधान बदलण्याची प्रक्रीया सुद्धा बाबासाहेबांनी संविधानात लिहुन ठेवली आहे. लोकसभेत बहुमत, राज्य सभेत बहुमत, आणि देशातील १९ राज्याची पसंती किन्वा मतदान जर संविधान बदलाच्या बाजूने असेल तर, संविधान बदलू शकतात. आता त्यात असेही लिहले आहे, की मूळ ढाचा आणि मूलभूत जनतेचे अधिकार यांना हात ना लावता संविधान बदलू शकता. अरे कोण अडवणार यांना मूलभूत ढाचा बदलताना? आणि अधिकार बदलताना. ज्यांना नीट बसून शी करता येत नाही असे आमचे नेते. ज्यांच्या नजरे समोर अन्याय अत्याचार आणि संविधानाचा रोज अपमान होत आहे. हे नेते वाचवतील तुम्हाला आम्हाला आणि संविधाला? ज्यांना राजकारणाचा र सुद्धा माहीत नाही. हे वाचवतील ? जे मोठ्या पदावर जातात फक्त स्वार्थासाठी. मग बौद्धांचे पाय तुटू दे नाहीतर गळे कापू दे. हे असे आपले आजचे नेते मग त्यात महाराष्ट्रतील सर्वच आले बरं. तो तुझा नातेवाईक माझा असू दे किंवा माझा नातेवाईक असुदे . नाहीतर माझ्या बाबांचा नातेवाईक असुदे.
काय समजता तुम्ही ? कशासाठीआहे हा बीजेपीचा उठाठेव ? कोण जातात म्युनिपाल शाळेत फक्त गरीब मागासवर्गीयच ना ? म्युनिसिपल शाळेत आठवी पर्यंत गमभन न येता या मुलांना पास करणे म्हणजेच त्यांची बरबादीच करणे हा उद्देश आहे. कशासाठी खोटे बोलून अमिश दाखवून किन्वा अमिश देऊन सत्ता मिळवणे आहे ? काय आहे सर्व देशाचे खाजगीकरण करून गरिबाला गरीब करून फक्त देशातील आठचार लोकांच्या हातात देशाची संपत्ती गोळा करणे. काय आहे गरज पडेल तेव्हा त्या गोळा केलेल्या संपत्तीचा उपयोग, सत्ता मिळविण्यासाठी व विरोधकांना संपविण्यासाठी करणे. खरेखोटे माहीत नाही. पण बोलले जाते की सत्ता परिवर्तन करण्यासाठी पन्नास करोड रुपये एका आमदाराला दिले गेले. अहो वेळच आली तर मुख्यमंत्रीच विकत घेता येईल इतका पैसा यांनी जमा केला आहे. जे चित्र आज दिनांक २९/६/२२ रोजी महाराष्ट्राने पाहिले ते चित्र दुःखद होते. पण खरंच हे सगळे सत्ता मिळवण्यासाठी होते का ? तर नाही… अहो सत्ता तर त्यांची अशीही बहुमताने पूर्ण भारत देशावर आहे. मग कशाला हा सर्व बीजेपीचा आटापिटा? नीट वाचा. होय त्यांचे धोरण गणित या देशावर राज्य करणे मुळीच नाही. संविधान बदलने हा मुख्य हेतू आहे. बाबासाहेबांनी लिहलेले संविधान हे त्यांना आपल्या माथ्यावरचा कलंक वाटतो तो त्यांना पुसणे आहे. आणि संविधान बदलण्यासाठी राज्यसभा आणि लोकसभा येथे त्यांना होकार मिळेल पण १९ राज्यांचा जो होकार पाहिजे तो त्यांना मिळवायचा आहे. म्हणून जास्तीत जास्त राज्यात आपली सत्ता यावी या धडपडी आहेत. म्हणून आमदार खासदारांची खरेदी , आणि या खरेदीला पैसा लागतो. म्हणून देशातील अनेक सरकारी उद्योग वसाहती, रेल्वे , विमाने खाजगी भाड्याने देऊन पैसा गोळा करणे हा मुख्य हेतू. इतकेच काय तर पोलीसी यंत्रणेत आधीच खाजगी लोक आले आहेत. पण आत्ता मिलेक्टरी ही भाड्याने म्हणजे खाजगी करणार. कोण रोखणार यांना? यांना या भारत देशाची सत्ता पाहिजे म्हणून हा सगळा उठाठेव सुरू नसून संविधान बदलणे हे जातीवाद्यांचे षडयंत्र आहे.
बुद्धांच्या काळात पूर्ण भारत बौद्धमय झाला होता. नंतरच्या काळात भारत देशातून बौद्ध भिक्षु इत्तर देशात गेले व तिकडे धम्म पसरविला त्यानंतर अवघ्या ३५० वर्षांनी पुष्यमित्र शुंग याने मौर्यवंशी राजाला घाताने संपविले. व स्वतः राजा झाल्यानंतर बुद्ध धम्म या देशात त्याने संपविला. कारण देवधर्म कर्मकांड, षड्यंत्र व खोटारडेपणा याचा विरोध म्हणजेच बुद्धधम्म. पुन्हा ४०० वर्षांनी अशोक राजा अशोक सम्राट याने, धम्म स्वीकारून पूर्ण जगभरात बुध्द धम्म पसरविला. परन्तु इसवीसन ७०० -८०० च्या काळात पुन्हा तो हिंदू धर्मियांनी कर्मकांड आणून संपवायला सुरवात केली. आणि इसवीसन ११००-१२०० च्या काळात भारतातून बुद्ध धम्म संपूर्ण संपला. ही तिसरी वेळ येत आहे माझ्या बंधूंनो. बुद्ध धम्माचे कुणी काही वाकडं करू शकणार नाही असं समजू नका. राजकारणात जे सगळं चालू आहे ते बुद्धधम्म संपविण्यासाठीच. आपण जागे होणे फार गरजेचे झाले आहे. नाहीतर गळा कापलाच म्हणून समजा. आणि जर तुमचा-माझा नाही कापला तर उद्या मुलांचा गळा नक्कीच कापला जाईल. संविधान बदलल्यावर हा फरक पडेल. बौद्धांना तिसऱ्यांदा संपवतील..
जर हिंदुस्थान म्हणून मान्यता मिळाली तर,,, बौद्ध सोडून, पुन्हा शुद्र म्हणजेच मागासवर्गीय सात हजार जाती जर हिंदू म्हणून वागू लागल्या तर, मागास जातींना पुन्हा मंदिर प्रवेश नाकारून, किंवा या प्रकारचे अनेक हतखंडे वापरून शुद्रतेकडे नेतील ते जाऊद्या… पण येथे देशात बौद्ध नगण्य होतील. आणि बौद्धलोक हे देव आणि धर्माचे विरोधक आहेत म्हणून. कृषी पुस्यमित्र शुंग याने जसे त्या वेळी जे स्वताला बौद्ध म्हणतील त्या बौद्धांची मुंडकी छाटली. व भारतातील बौद्ध संपविला त्याची हिंदुकडून पुनरावृत्ती होईल ही दाट श्यक्यता दिसून येत आहे. हिंदुस्थान झाल्यावर हा मामुली फरक पडेल..
यात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. अपेक्षा आहे समजेल. ––
सुनिल गायकवाड ९८२१ ५६४ १५८.
भीम आर्मी भारत एकता मिशन.
महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत