आनंद बुध्द विहार हडको तुळजापूर येथे नुकत्याच झालेल्या माता रमाई जयंतीचे औचित्य साधून विशेष वंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला
रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी आनंद बुध्द विहार हडको तुळजापूर येथे नुकत्याच झालेल्या माता रमाई जयंतीचे औचित्य साधून विशेष वंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा धाराशिवच्या अध्यक्षा आयु. विजयमालाताई धावारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून TISS तुळजापूर चे संचालक प्रा. डॉ. रमेश जारे सर व शकुंतलाताई जारे, गजानन हिवाळे सर व त्यांच्या सुविद्य पत्नी त्याचबरोबर विशेष उपस्थिती प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर सर यांची होती. भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा तुळजापूर च्या सुमित्रा ताई माने, ज्येष्ठ उपासिका चतुराताई रवींद्र कदम, यांच्या सह तालुका व जिल्हा शाखेचे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.
आदर्शांच्या पुजनानंतर चिमुकल्या समृद्धी राहुल वाघमारे हिने सादर केलेल्या ” मी रमाई बोलतेय” या हृदयस्पर्शी कवितेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमांमध्ये बौद्ध धम्मदीक्षा घेतलेल्या हंगरगा येथील आयु. रोहिणी ताई व अनिल सरतापे आणि आयु. प्रज्ञाताई व वैभव सिरसाट या कुटुंबांचा वस्त्रदान संविधान उड्डेशिका प्रत व पुष्पगुच्छ देऊन उचित सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना आयु. रमेश जारे सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाबद्दल काढलेले गौरवोद्गार वाचून दाखवले. समता सैनिक हे खूप मोठे कार्य करीत आहेत व दलातील सर्व महिला व पुरुष सैनिकांचे त्यांनी भरभरून कौतुक केले. यावेळी समता सैनिक असलेल्या राजश्रीताई कदम, लताताई चौधरी, लक्ष्मीताई महेश कदम यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून तुळजापूर न्यायालयातून सेवानिवृत्त झालेल्या आयु. वर्षाताई लांडगे, ST महामंडळातून सेवानिवृत्त झालेले आयु. विलास सरवदे, पंचायत समिती कळंब येथे कार्यरत असलेल्या निताताई शेरखाने यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा धाराशिव चे स्वामिनाथ चंदनशिवे, कुमार ढेपे, विद्यानंद वाघमारे, अपसिंगा येथील गौतम सोनवणे, TISS येथील पृथ्वीराज सोनवणे, जीवन वाघमारे, राणीताई प्रफुल्ल कदम व शिंदे सर, हडको तुळजापूर येथील दिपालीताई सागर कदम, कमलताई साळवे व परिवार, सुमनताई रोकडे, सत्यशीलाताई कदम, आयु. रवी साखरे, आयु. प्रियाताई दिनेश डोलारे, आयु. शीतलताई प्रदीप कदम व मी रमाई बोलतेय ही कविता सादर केल्याबद्दल कु. समृद्धी वाघमारे हिला संविधाना उद्देशिकेची प्रत सप्रेम भेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिटणीस आयु. विद्यानंद वाघमारे यांनी संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले. आज संविधनावर आपल्या डोळ्यादेखत हल्ले होत आहेत, आपण संविधान टिकवण्यासाठी कष्ट घेतेले पाहिजेत असे कळकळीचे मत व्यक्त केलं.
YC कॉलेज तुळजापूर येथे मत्स्यशास्त्र तसेच संस्कृतिक विभागात 12 वर्षे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर सरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ.संभाजी नगर येथे असोसिएट प्रोफेसर ही पदोन्नती मिळाल्याबद्दल समाजाच्या, विहाराच्या व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांचा पंचशील पताका, पुष्पगुच्छ व संविधान उद्देशीका प्रत देऊन छोटेखानी सत्कार करण्यात आला.
सत्कार स्वीकारत असताना सरांनी यश पाहिजे असेल तर परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी लागेल असे सांगितले. विद्यार्थी दशेतील व सुरुवातीच्या काळातील खडतर प्रवासात परिवाराची, कुटुंबाची मोलाची साथ मिळाली त्याबद्दल आभार मानले. आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये राहून आपल्या समाजासाठी योगदान दिले पाहिजे जसं की शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी मुलांचे स्कॉलरशिप, होस्टेल याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपली पुढची पिढी शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि संविधानाने दिलेले हक्क सुरक्षित ठेवता येतील असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले.
कार्यक्रमापूर्वी सोलापूर येथील जीएम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते आयु. बाळासाहेब वाघमारे सर यांनी आनंद बुध्द विहार हडको तुळजापूर येथे सदिच्छा भेट दिली व रवींद्र दादा कदम वाचनालय तसेच अभ्यासिका व सभागृहाच्या बाबतीत कार्यकर्त्यांच्या कामाचे कौतुक केले.
आयु. इशिता व माही सागर कदम या चिमुकल्यांनी बाबासाहेब व रमाईचे सुंदर गीत सादर केले.
अध्यक्षीय समारोपात आयु. विजयमाला ताई धावारे यांनी धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगून उपस्थितांचे आभार मानले.
आयु. दत्ता सुखदेव माने यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात सहकार्य केले.
2 मिनिट स्तब्ध उभे राहून दिवंगत भागवत मसाजी वाघमारे यांना आदरांजली वाहण्यात आली व सरणतेय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.
जारे परिवाराच्या वतीने उपस्थितांना खीरदान देण्यात आले.
विहार स्वच्छ करण्यासाठी सिद्धार्थ दत्ता माने, रत्नदीप श्रावण कदम, आर्यन शैलेंद्र कदम इत्यादींनी सहकार्य केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत