
गेले तीन दिवस सुरू असलेल्या युद्धामध्ये जवळपास एक हजार २०० लोकांचा बळी गेला असून दोन्ही बाजूंचे हजारो लोक जखमी झाले आहेत.
हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलला मदत करण्यास सज्ज राहण्यासाठी विमानवाहू जहाज पूर्व भूमध्य समुद्राकडे रवाना करण्याचा आदेश आपण दिला असल्याचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन यांनी रविवारी सांगितले. हल्ल्यातील मृत आणि बेपत्ता लोकांमध्ये अमेरिकी लोक असल्याचे सांगण्यात येते.
अमेरिकी नौदलातील सर्वात नवीन आणि अतिशय प्रगत विमानवाहू जहाज असलेले यूएसएस गेराल्ड फोर्ड व त्यावरील अंदाजे ५ हजार नाविक, तसेच काही लढाऊ विमाने इस्रायलकडे जाणार असून, त्यांच्यासोबत युद्धनौका आणि विनाशिका असतील. या शक्तिप्रदर्शनाचा उद्देश कोणत्याही गोष्टीला प्रत्युत्तर देण्याचा असून, अतिरिक्त शस्त्रे हमासपर्यंत पोहचण्यापासून रोखणे आणि टेहळणी करणे हे त्याचे प्रमुख काम असेल.
दरम्यान, गेले तीन दिवस सुरू असलेल्या युद्धामध्ये जवळपास एक हजार २०० लोकांचा बळी गेला असून दोन्ही बाजूंचे हजारो लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यामध्ये मोठय़ा प्रमाणात सामान्य लोकांचा बळी गेला आहे. इस्रायलमध्ये जवळपास ७०० लोक ठार झाले, तर गाझा पट्टीत इस्रायलच्या प्रत्युत्तरामध्ये मरण पावलेल्यांची संख्या जवळपास ५०० असल्याचे सांगण्यात आले. इस्रायलने गाझावरील जवळपास एक हजारांपेक्षा जास्त लक्ष्यांवर हल्ला केल्याचा दावा केला. तसेच या हल्ल्यामध्ये ईशान्य गाझा भागातील बीट हनुन हे गाव मोठय़ा प्रमाणात उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात आले. तर, आपण इस्रायलच्या १३० पेक्षा जास्त लोकांना ओलीस ठेवले असल्याचा दावा हमासने केला.
सोमवारी इस्रायली सैन्याने गाझा पट्टीवर हवाई हल्ले केले, तसेच सीमा भागावर रणगाडे तैनात केले. हमासने आक्रमणाच्या वेळी ताब्यात घेतलेला आपला भाग पुन्हा ताब्यात मिळवला असल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिली. दुसरीकडे, हमासने जेरूसालेम आणि इस्रायलची राजधानी तेल अविववर हवाई हल्ले सोमवारीही सुरू ठेवले. युद्धामुळे इस्रायलमध्ये अडकून पडलेल्या परदेशी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हमासच्या हल्ल्यात अॅश्केलन येथे रुग्णसेविका म्हणून काम करणारी एक भारतीय महिला जखमी झाली. तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. हमासच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेले नेपाळचे १० विद्यार्थी ठार झाले. तर आपले दोन नागरिक या हल्ल्यांमध्ये अडकले असल्याची माहिती स्पेनतर्फे देण्यात आली. हमासच्या हल्ल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी हमासच्या हल्ल्याची तुलना रशियाच्या आक्रमणाबरोबर केली, तर हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलला पाठिंबा दिला नाही म्हणून अमेरिकेचे सिनेट सदस्य चक शुमेर यांनी चीनवर टीका केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत