सरदार पटेलांनी डिप्रेस्ड क्लासेसच्या संसदेतील व विधी मंडळातील आरक्षणाची तरतूद संविधान मध्ये करण्यास नकार दिला होता हे नरेंद्र मोदी सांगतील काय…..?

▪️गुरुवार , 8 फेब्रुवारी 2024.
▪️डॉ.संजय दाभाडे , पुणे
9823529505.
नरेंद्र मोदीं नी काल संसदेत सांगितले की नेहरू हे दलित व आदिवासींना आरक्षण देण्याच्या विरोधात होते.
पण मग ज्या पटेलांचा भव्य दिव्य पुतळा मोदींनी उभारला ते आणि हिंदूंचे आरक्षणाच्या बद्दल काय धोरण होते ते मोदी सांगणारं आहेत का…..?
सरदार पटेल हे संविधान सभेतील अल्पसंख्यांक साठीच्या सल्लागार समितीचे प्रमुख होते. पटेल हे सरळ सरळ दलितांच्या राजकीय आरक्षण विरोधात भूमिका घेत होते.
संविधान मध्ये अस्पृश्यता नष्ट करणारे कलम दाखल झालेले असल्याने आता अस्पृश्यांच्या साठी राजकीय आरक्षण ठेवण्याची गरज नाही असे पटेलांचे म्हणणे होते.
एकीकडे खरे तर स्वतंत्र मतदारसंघ मागणारे डॉ.आंबेडकर पटेलांच्या ह्या भूमिके नंतर संतप्त झाले आणि त्यांनी अक्षरशा निर्वाणीचा इशारा दिला –
” माझ्या तब्येतीची पर्वा न करता मी संविधान सभेचे काम तीन वर्षे केले ते यासाठी की मी अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी काही करू शकेल ….परंतु जर डिप्रेस्ड क्लासेस साठी आरक्षण ची तरतूद संविधानात केली जात नसेल तर मी संविधान सभेच्या बाहेर पडेल आणि मग अस्पृश्यांच्या कल्याणाचा मुद्दा हिंदूंच्या समोर आल्यावर हिंदूंनी त्यास कसा विरोध केला हा इतिहास लिहिला जाईल….”
आणि ह्यानंतर खरोखरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या बैठकांना तीन चार दिवस गैरहजर राहिले….!
त्यानंतर घाबरलेल्या नेते मंडळी ना ह्या मुद्द्यावर माघार घ्यावी लागली कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभे मधून बाहेर पडणे म्हणजे संविधान निर्मितीला खीळ घालन्या सारखे होंनार होते.
त्यामुळे अखेरीस राजकीय आरक्षण संविधानात समाविष्ट करणे पटेलांच्या सहित सर्व हिंदू नेत्यांना भाग पडले.
▪️ संदर्भ – Ambedkar , Gandhi and Patel : The making of India’s Electoral System – Raj Sekhar Vundru
( Bloomsbhry Publication),
पृष्ठ क्रमांक 138.
▪️ डॉ.संजय दाभाडे ,पुणे
9823529505
sanjayaadim@gmail.com
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत