गरीबी ही निराशा नसून शिक्षणातून यशस्वी होण्याचा आशावाद:– प्रबुद्ध साठे


भंडीशेगाव (पंढरपूर) :- गरीबी मुळे मी शिकलो नाही, परस्थिती ने साथ दिली नाही अशी सबब सांगून नाउमेद होवून पळवाट शोधू नका, तर गरीबी व प्रतीकुल परस्थिती च शिक्षण घेण्याचे भांडवल आहे, त्यातूनच जिद्द, चिकाटी, संघर्ष करण्याची प्रेरणा व ताकद मिळते, गरीबी ही निराशा नसून शिक्षणातून यशस्वी होण्याचा आशावाद आहे असे विद्यार्थी व युवकांना प्रेरणा देणारे प्रबोधन पर विचार चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियानाचे प्रमुख व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी मांडले, ते आपल्या जन्म भूमी असणाऱ्या भंडीशेगाव (पंढरपूर) येथे केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या इंडियन संख्या शास्त्रस सेवा परिक्षा (ISS) मध्ये आयु प्रशांत विद्या विजय ननवरे देशात 28 वा व महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाने पास होऊन निवड झाली, त्यांचा नवबौद्ध तरूण मंडळ, समाज व संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य सत्कार समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रबुद्ध साठे बोलत होते,
यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित (आबा) पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे समाधान काळे, डॉ बाबासाहेब देशमुख प्रदेश अध्यक्ष पुरोगामी युवक संघटना, नवोदय विद्यालय पोखरापूर प्राचार्य संजय कोठाडिया, एम् एस पवार, प्रशांत वाघमारे, सरपंच मनिषाताई यलमर, अजीत दादा कंडरे, राहुल पाटील, पल्लवी कंडरे (यलमर), प्रशांत ननवरे चे आईवडील विद्याताई व विजय ननवरे , वामन यलमर (पोलीस), आदी मान्यवर व मोठ्या प्रमाणात बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते यानिमित्ताने प्रशांत ननवरे यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली,, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश ताकतोडे, शहाजी ननवरे, संतोष ननवरे, मनिष ननवरे, आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले, आपल्या भाषणात प्रबुद्ध साठे पुढे म्हणाले, देव, धर्म, जत्रा, यात्रा, अंधश्रद्धा वर खर्च करण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा, देशाला मंदीराची गरज नसून शाळेची गरज आहे, गुणवत्तेच्या नावाने बोंबा मारणार्यांच्या सणसणीत थोबाडीत मारुन प्रशांत ने यश संपादन केले, त्याचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा त्याच्या कडून युवकांनी प्रेरणा घ्यावी,
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत