ज्ञानव्यापी मशिदीच्या तळघरात हिंदू पक्षाला पूजेसाठी अलाहाबाद हायकोर्टाने परवानगी
ज्ञानव्यापी मशिदीच्या तळघरात हिंदू पक्षाला पूजेसाठी अलाहाबाद हायकोर्टाने परवानगी दिली आहे. तर मग बौद्ध समाजाला सोमनाथ मंदिराच्या तळघरात पूजेची परवानगी का नाही ?
ज्ञानव्यापी मशिदीमध्ये हिंदू धर्माचे प्रती क शिवलिंग सापडले असे म्हणतात. म्हणून तिथे हिंदू पक्षाला मशिदीच्या तळघरांमध्ये पूजा करण्याची परवानगी न्यायालयाने दिलेली आहे. ज्ञानव्यापी मशिदीच्या उत्खननात स्तूप आणि उलटे स्वास्तिक सापडलेले आहे. स्तूप आणि उलटे स्वास्तिक ही बुद्ध धम्माची प्रतीके आहेत. परंतु या गोष्टीकडे सर्रास दुर्लक्ष झालेले दिसत आहे. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य आहे.
सोमनाथ मंदिराचे ट्रस्टी खुद आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहेत. सोमनाथ मंदिराच्या तळघराशी काय दडलेले आहे याचा शोध घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. कदाचित या ट्रस्टी मंडळींना असे वाटत असेल की या मंदिराच्या तळघराशी प्रचंड सोन्याचा खजिना दळलेला असावा असे वाटले असेल. म्हणून सुद्धा या मंदिराच्या खाली काय दडलेले आहे याचा शोध घेण्याची इच्छा सर्वांनी व्यक्त केली असावी.
म्हणून गांधीनगर आयआयटी ने या मंदिराचे Ground Penetrating Radar या अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने संशोधन केले तर सोमनाथ मंदिराच्या खाली तीन मजली बुद्ध विहार असल्याचे गांधीनगर आयआयटी ला दिसून आले. तसा त्यांनी शासनाला अहवाल सुद्धा दिला. परंतु हा अहवाल अद्यापही सार्वजनिक करण्यात आलेला नाही.
जर ज्ञान व्यापी मशिदीच्या तळघरात शिवलिंग आढळून आले म्हणून हिंदू पक्षाला म्हणजे ब्राह्मणाला त्या ठिकाणी पूजा करण्याची परवानगी न्यायालयाने दिलेली आहे. मग सोमनाथ मंदिराच्या तळघरा खाली तीन मजली बुद्ध विहार आढळून आले आहे. त्यामुळे न्यायालयाने सोमनाथ मंदिर हे बुद्ध समाजाच्या हवाले करण्यात यावे किंवा तेथे बौद्धांना बुद्ध वंदना घेण्याची परवानगी का देण्यात येऊ नये ?( खालील बातमी ही दैनिक देशोन्नती, शनिवार ,दिनांक 3 फेब्रुवारी 2024 ला पहिल्या पानावर प्रकाशित झालेली आहे.)
प्रा. गंगाधर नाखले
03/02/2024
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत