
महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंग हे निवडून येताच १५ आणि २० वर्षांखालच्या वयोगटासाठीच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांची घोषणा केली होती. या स्पर्धा उत्तरप्रदेशात गोंडा मधल्या नंदिनी नगर इथं होतील असं त्यांनी जाहीर केलं होतं. केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघाच्या नवनिर्वाचित अध्यक्षांसह महासंघाचं निलंबन केलं आहे. मात्र ही घोषणा महासंघाच्या घटनेतील तरतुदी आणि नियमांना धरून नव्हती, स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना नियमांप्रमाणे तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नव्हता, त्यामुळे निलंबनाची कारवाई केल्याचं यासंबंधीच्या वृत्तात म्हटलं आहे. महासंघाच्या कार्यकारी समितीनं अशा स्पर्धांचे निर्णय घेणं अपेक्षीत आहे, आणि त्याआधी संबंधीत प्रस्तावही विचारार्थ घेणं अपेक्षीत आहे, मात्र नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी क्रीडा नियमांना बगल देत हा निर्णय घेतला, त्यातून महासंघ अजूनही या आधीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात असल्याचं दिसतं असंही या वृत्तात म्हटलं आहे. क्रीडा मंत्रालयानं पुढच्या आदेशापर्यंत महासंघाला आपलं काम स्थगित करण्याचे निर्देश दिले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत