अमळनेरमध्ये ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ…

मराठी साहित्य आणि भाषा टिकवण्यासाठी शासनाबरोबर वेगवेगळ्या समाजघटकांनीही प्रयत्न करावे अशी गरज संमेलनाध्यक्ष रविंद्र शोभणे यांनी आज व्यक्त केली. जबाबदारी मराठीला ज्ञानभाषा करण्याची जबाबदारी सरकारसह नागरिकांचीही आहे. अमळनेरमध्ये ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. राज्यसभा आणि विधानपरिषदेवर वेळोवेळी साहित्य, कला क्षेत्रातल्या मान्यवरांची वेळोवेळी नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली. साहित्यातून समाजात वागावे कसे याची शिकवणूक मिळते. तळागाळातल्या लोकांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी राजकारण, समाजकारण केलं जातं, असं उद्घाटक सुमित्रा महाजन यांनी सांगितलं.
साने गुरुजींच्या स्मारकाचा प्रस्ताव जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी तयार करावा. या प्रस्तावानुसार साने गुरुजींच्या स्मारकास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिलं. लवकरच मराठी भाषा धोरण जाहीर करणार असल्याचं मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी जाहीर केलं. साहित्यिकांच्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांच्या बळकटीकरणासाठी करण्याची गरज संमेलनाचे निमंत्रक अनिल पाटील यांनी व्यक्त केली. ग्रंथदिंडीच्या पालखीत दासबोध, श्री ज्ञानेश्वरी, भारताचे संविधान, श्रीमद् भगवतगीता, भारतीय संस्कृती या ग्रंथ गुरूंचा समावेश होता. संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील अनेक साहित्यिकांसह रसिक अमळनेरात दाखल झाले आहेत. अमळनेरच्या साने गुरुजी साहित्यनगरीत अखिल भारतीय मराठी महामंडळाचे ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घघाटन आज लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झालं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते. संमेलनाच्या आधी सकाळी वाडी संस्थानपासून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत