नाशिकमधे सरकारी ठेकेदार आणि सनदी लेखापालांच्या कार्यालय आणि निवासस्थानी आयकर विभागाचे छापे…

पीडब्ल्यूडी, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेशी निगडित असलेले सरकारी ठेकेदार आणि त्यांच्याशी निगडित काही चार्टर्ड अकाउंटंट यांच्यावर ही कारवाई झाली. नाशिक शहरात आज सकाळी आयकर विभागानं काही सरकारी ठेकेदार आणि सनदी लेखापाल यांच्या कार्यालयावर आणि निवासस्थानी छापे टाकले. ही कारवाई अजून एक-दोन दिवस चालण्याची शक्यता आहे. यातल्या दोन ठेकेदारांचं नाशिक मध्ये वास्तव्य असलं तरी ते सिन्नर तालुक्याशी निगडित आहेत,तर एक ठेकेदार हा मुंबई नाका इथे वास्तव्याला असून महाराष्ट्र पोलीस अकादमीसह काही सरकारी इमारती बांधण्यामध्ये त्याचा सहभाग आहे. याच ठेकेदाराचा व्यवसायिक भागीदार जिल्हा परिषदेचा माजी सदस्य आणि सभापती असल्याचं समजतं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत