विधानभवनात आजपासून ८४ वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद…

महाराष्ट्रामध्ये याआधी २००३ साली ही परिषद मुंबईत घेण्यात आली होती. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी महाराष्ट्राला ही परिषद आयोजित करण्याचा बहुमान मिळाला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून मुंबईत विधानभवनात ८४ वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद तसच भारतातील राज्य विधिमंडळ सचिवालयांच्या सचिवांची ६० वी परिषद सुरु होत आहे. ती २९ जानेवारी पर्यंत चालेल. या परिषदेत संसदीय लोकशाही आणि विधिमंडळ कामकाजाशी निगडीत विविध मुद्यांवर विचारमंथन होईल, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिली. या परिषदेसाठी भारतातील सर्व विधानसभांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसच काही राज्यांमधील विधानपरिषदांचे सभापती, उपसभापती, सर्व विधिमंडळ सचिवांना निमंत्रित करण्यात आल आहे. या परिषदेत ‘विधानमंडळ सेवेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे’ या विषयावर विचारमंथन होईल. पीठासीन अधिकाऱ्यांच्या या परिषदेबरोबरच भारतातील विविध राज्यातील विधिमंडळ सचिवांची ६० वी परिषद देखील होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत