इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज हैदराबाद इथं सुरु झाला. त्यांचा पहिला डाव ६५ व्या षटकातच २४६ धावांवर आटोपला. कर्णधार बेन स्टोक्सनं सर्वाधिक ७० धावा केल्या.
रविंद्र जडेजा आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले, तर जसप्रित बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. यशस्वी जयस्वाल ७६, तर शुभमन गिल १४ धावांवर खेळत आहे. कर्णधार रोहित शर्मा २४ धावांवर बाद झाला. पहिल्या डावात आज दिवसअखेर भारताच्या एक बाद ११९ धावा झाल्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत