नळदुर्ग येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वस्तीगृहात अजब कारभार…
चक्क विद्यार्थांना नासलेली फळे व निकृष्ट दर्जाचे भोजन , प्रशासनाचे दुर्लक्ष ठेकेदारावर कारवाईची मागणी
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वस्तीगृह तेथील कर्मचाऱ्यांचा अजब कारभार उघडकीस आला याच वस्तीगृहात विद्यार्थांना भोजनाचे तिन तेरा नऊ आठरा झाले आहे शिवाय विद्यार्थ्यांना चक्क नासकी व कुजकी फळे खान्यासाठी देतात हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय “वस्तीगृह आसुन आडथाळा , नसुन खोळंबा ” ही म्हण खरी ठरली आहे .
नळदुर्ग येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सोईसाठी महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय मागासवर्गीय शासकीय वस्तीग्रह खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने केलेल्या असून या शासनाच्या योजनेला शासनाच्या कर्मचाऱ्यांनीच चुना लावण्याचे काम करत आहेत निकृष्ठ दर्जाचे कडधान्य रेशनचे तांदुळ देऊन ठेकेदाराने चक्क शासनाची फसवणूक केली आहे व विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन व्यवस्था आसल्याने विद्यार्थांचे आरोग्य धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही आशा संबंधित गुत्तेदारावर ठेकेदारावरती प्रशासनाने कारवाई करावी आशी मागणी नागरिकांना होत आहे .
या वस्तीगृहात ४७ विद्यार्थ्यांचा प्रवेश असला तरी फक्त काही विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित राहातात बाकीचे विद्यार्थी कुठे आहेत याकडे कर्मचार्यांचे दुर्लक्ष दिसत आहे, विद्यार्थ्यांना जेवणाचे आणि फळांचा निकृष्ट दर्जाचा जर वापर होत असेल तर मग या ठेकेदारावरती कारवाई करावी की जेणेकरून विद्यार्थ्यांचे आरोग्य आणी ठेकेदाराचा हलगर्जीपणा प्रशासनाच्या दुर्लक्षा मुळे हे ठेकेदाराचा मज्जाव दिसत आहे एखदा गोड पदार्थ खाण्यासाठी देतात मौसाहारी जेवण हे निकृष्ठ दर्जाचे मिळत आसल्याने विद्यार्थामध्ये ही नाराजीच सुर देत काहीनी भावना व्यक्त केल्या आहेत .
वस्तीगृहात कडधान्य किंवा किरणा मालाचा पुरवठा करणाऱ्या व भातासाठी लागणार्या तांदूळ हा रेशनचा पुरवठा केला जातो आहे आसे स्वयपांक गृरातील कर्मचार्याने माहिती दिली आहे याच बरोबर भाजीपाला , मटन, चिकन व फळाचा पुरवठा करणारा ठेकेदार हा बिडचा आसुन देण्यात येणारा नासका फळाचा बाजार हा बंद करण्यासाठी ठेकदाराची ठेकेदरी बंद करायला हवी या साठी युवक नागरीकानी पुढाकार घ्यायला हवा गोडा पदार्थांच्या गुलाब जामुन कच्च्या प्रमाणात उपलब्द करतात आशा खाण्याने विद्यार्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय मुलांचे वस्तीगृहातील कर्मचारी कनिष्ठ लिपीक टंकलेखक मोटे बी आर ,
शिपाई विभुते एल के , स्वयंपाकी गोरे आर बी , चव्हाण एम झेड , जाधव के बी , मदतनिस काकडे एम एन अदिजन आसुन तेथील अधिक्षक काही दिवस रजेवर असल्याने त्या वस्ती गृहाचा प्रमुख मोटे यांच्या कडे आसुन आशा निष्काळजी करणाऱ्या कर्मचार्यावर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे .
याबाबत समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी समिती गठीत करून वरिष्ठ चौकाशी करावी या आगोदर आसाच प्रकार घडला होता परंतू समाज कल्याण विभागाचे अधिकारी येऊन चौकशी करून थातूर मातूर कारवाई केली होती हे प्रकरण तिथेच बंद करण्यात आले होते परंतु आसाच प्रकार आज ही घडत आसल्याचे उघडकीस आले आहे . कर्मचारी व ठेकेदारांनी विद्यार्थांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न चालू आसल्याचे सांगण्यात आले आहे खराब अन्न व नासलेली पदार्थ खाण्यासाठी दिल्यास आर्धे अन्न वाया जात आसल्याचे निदर्शनास आले आहे .
जे कर्मचारी या ठिकाणी नेमलेले आहेत तेच या घटने ला जबाबदार आसल्याचे संशय व्यक्त करण्यात येत आहे या विषयी अधिकारी यांनी गंभीर दखल घेऊन कारवाई करण्यात यावी आशा प्रकाराचा सावळा गोंधळ कधी बंद होणार आसुन याकडे विद्यार्थी व पालका तुन नाराजी व्यक्त करण्यात आली आहे . हे सर्व पाहाता ठेकेदाराला संबधीत विभागाचा आभय आसल्याचे दिसुन येत आहे आशा प्रकारचा संशय व्यक्त केला जातोय परंतू शासकीय स्तरावर कोणती कारवाई केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत