लता भगवान डांगे
धम्म म्हणजे सदाचरण. म्हणजेच जीवनाच्या सर्व क्षेत्रांत माणसा-माणसातील व्यवहार उचित असणे
यावरून स्पष्ट होते की, मनुष्य एकटाच असला तर त्याला धम्माची आवश्यकता
परंतू ज्या वेळी दोन माणसे कोणत्याही संबंधाने एकत्र येतात , तेव्हा त्यांना आवडो अगर न आवडो धम्म हा पाहिजेच. त्यापासून सुटका व्हावयाची नाही. दुसर्या शब्दात सांगायचे म्हणजे समाज धम्माशिवाय असूच शकत नाही.
समाजाला खालीलपैकी कोणता तरी एक पर्याय पसंत करावा लागतोच.
समाज वाटेल तर शासनाचे साधन म्हणून धम्माची निवड करणार नाही.
कारण धम्म हे तर शासनाच्या साधनाहून वेगळे नाही.
असा समाज ( जो धम्माचा शासनासाठी स्वीकार करनार नाही तो ) अराजकाचा मार्ग स्वीकारील.
दुसरा पर्याय म्हणजे समाज पोलिस, म्हणजेच हुकुमशाही, याचीच शासनासाठी निवड करू शकेल.
तिसरा पर्याय म्हणजे समाज धम्माबरोबरच धम्माचे उल्लंघन करणार्या लोकांनी शासन करणारा मॅजिस्ट्रेट याचा स्वीकार करू शकेल.
अराजक आणि हुकुमशाही या दोन पर्यायात स्वात्रंत्याचा नाश होतो.
फक्त तिसर्या पर्यायात स्वात्रंत्र्य टिकू शकते.
ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे त्यांनी धम्माचा स्विकार केला पाहिजे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत