मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठीचं २३ जानेवारी पासून सर्वेक्षण…
मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांचं सर्वेक्षण होईल. राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्याचं सर्वेक्षण येत्या मंगळवारपासून राज्यभरात सुरू होणार आहे. ३१ जानेवारीपूर्वी हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचं नियोजन आहे. या सर्वेक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगानं सॉफ्टवेअर आणि प्रश्नावली दिली आहे. दरम्यान, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जाती संदर्भात आढळून आलेल्या ५४ लाख नोंदीच्या आधारे पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी, तत्काळ विशेष शिबिरांचं आयोजन करण्याचे आदेश, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.राज्य सरकारी कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी हे सर्वेक्षण करतील. यासाठी २० जानेवारीला प्रशिक्षकांचं आणि २१ तसंच २२ जानेवारीला सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण होईल. या नोंदी नागरिकांना पाहता याव्या यासाठी तलाठ्यांमार्फत गाव पातळीवर या याद्या उपलब्ध करुन देण्याची सूचनाही त्यांनी केली. याचा नोंदीचा पुरावा म्हणून वापर करुन पात्र व्यक्ती जातीचे दाखले काढू शकतील.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत