स्वतः मेलास तरी चालेल………

संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे
संविधान प्रचारक/प्रसारक सिडको, नांदेड.
बेरोजगारी वाढतेय, वाढू दे.
रिकाम्या हातांना काम नाही, नसू दे.
शेतमालाला भाव नाही, नसू दे.
शेतकरी आत्महत्या करतोय करू दे.
तरूणांना नौकरी नाही, नसू दे.
जीएसटी टॅक्सने कंबरडे मोडलेय, मोडू दे.
कारखानदारी बंद होतेय, होऊ दे.
शिक्षणाचा बाजार सुरू आहे, राहू दे.
अंबानी-अदानी बँका लुटतात, लुटू दे.
संघ अन् साधूने अराजक माजविले, माजवू दे.
संविधान धोक्यात आलेय, येऊ दे.
न्याय व्यवस्था बटीक झालीय, होऊ दे.
कलाकार-अंधभक्तांची मुजोरी-गुंडगिरी वाढलीय, वाढू दे.
बहुजन संत-विचारवंताचे खून पाडताहेत, पाडू दे.
काय व्हायचंय ते होऊ दे.
पण बेंबीच्या देठापासून तू फक्त “जय श्रीराम” म्हण.
स्वतः मेलास तरी चालेल,
पण स्वतः मधला हिंदू जागव!
हिंदू जगला, तरच अंबानी जगणार, अदानी जगणार आहेत,
हिंदुत्ववाद्याचे ठेकेदार, आपले पुजनीय संघीय देव जगणार आहेत !
तुझ्याच बलिदानावर संघाला संघीय राज आणायचे आहे.
रक्षण कर हिंदुत्वाचे ! भेदाभेद, जाती-पात, श्रेष्ठ-कनिष्ठ, वर्ण-वर्ग वर्चस्ववाद याकडे दुर्लक्ष कर
आणि मनुस्मृतीचे राज्य पुन्हा आणण्यासाठी लढ.!
मनुस्मृतीचे राज्य आले की,
तुझा बाप मेल्यावर जिवंत जाळतील तुझ्या आईला !
तू तिच्या किंचाळ्या ऐकत “जय श्रीराम, ओरडत रहा.
धर्म जिवंत असल्याचे संकेत दिले जातील त्यावेळी;
बहीण अथवा मुलगी विधवा झालीच कधी तर भादरून काढ त्यांना म्हशीसारखे.
सावित्री, शाहू, फुले, आंबेडकराचे विचार गाडून टाक.
बनतील त्या गुलाम, दासी, मुरळया अन् देवदासी !
तेंव्हा कर त्यांच्या इज्जतीशी खेळणारांचे संरक्षण हिंदुत्वाचा पाईक म्हणून कर!
जय हो भारत !!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत