शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभांनी दिलेला निकाल अन्यायकारक असल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप…

आमच्यासोबत असलेल्या आमदारांना अपात्र ठरवलं नाही म्हणून नार्वेकर यांच्याविरोधात शिंदे यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अन्यायकारक निकाल दिल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज मुंबईत केला. आमचे सर्व आमदार या अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देतील, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. सत्तेचा मोह नव्हता म्हणून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. शिवसेनेच्या घटनेत २०१३ आणि २०१८ मध्ये झालेल्या घटनादुरुस्तीची कागदपत्रं निवडणूक आयोगाला सादर केली होती. त्याची पोचपावती शिवसेना आमदार अनिल परब यांनी सादर केली. याच घटनादुरुस्तीच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, राज्यसभा सचिवालय यांनी शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांना लिहिलेली पत्र परब यांनी यावेळी सादर केली. या घटनादुरुस्तीत पक्ष प्रमुख पदावर उद्धव ठाकरे यांची नेमणूक झाली आणि त्यांना सर्व निर्णय घेण्याचे सर्व अधिकार देण्याचे ठराव झाल्याचं परब म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेचे व्हिडीओ चित्रण दाखवले त्यात एकनाथ शिंदे, राहुल नार्वेकर यांच्यासह शिंदे यांच्यासोबत उपस्थित असलेले अनेक आमदार उपस्थित असल्याचं दिसत होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत