बुद्ध धर्म कालबाह्य झाला असे एखाद्या मूर्खाला वाटत असेल तर, सन 2009 साली सर्वश्रेष्ठ धम्म (धर्म ) म्हणून बुद्ध धम्माची (धर्माची ) निवड का केली ?

प्रा. गंगाधर नाखले मो.9764688712,7972722081
इंग्लंड मधील जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड विद्यापीठाची स्थापना 12 व्या शताब्दी झाली. गत 900 वर्षाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा ह्या संस्थेच्या पाठीशी असून हजारो विद्या विभूषित या विद्यापीठातून शिकून आजपर्यंत विविध क्षेत्रात प्रसिद्धीला आलेत.
डायनामाइट चा शोध लावणारे स्वीडनचे जगप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त 1901 सालापासून नोबेल पारितोषिके प्रदान करण्याची जी प्रथा सुरू झाली, तेव्हापासून गेल्या 115 वर्षात, या विद्यापीठातून पारंगत झालेल्या पैकी 27 विभूतींना विविध विषयातील नोबेल पारितोषिके बहाल करण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला. इतकेच नव्हे तर अनेक देशाचे राष्ट्राध्यक्ष/उपाध्यक्ष/ पंतप्रधान /उपपंतप्रधान/ संसद पटू आणि रसायन शास्त्रज्ञ आपला शैक्षणिक वारसा सांगताना ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नावाचा मोठ्या अभिमानाने उल्लेख करतात. एकट्या इंग्लंड देशाच्या आतापर्यंत झालेल्या पंतप्रधानापैकी 26 पंतप्रधान ह्याच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होते. अशा प्रतिष्ठित विद्यापीठाने अगदी अलीकडे एका अभ्यास गटाची स्थापना करून जगात 10,000 वर्षापासून ज्या ज्या थोर पुरुषांनी मानवाच्या कल्याणर्थ समतेची प्रस्थापना करून, काहीही हातचे न राखता, समाजाच्या उन्नतीसाठी आपले सर्व श्री बलिदान केले. अशा 100 महापुरुषांची निवड करून ‘ The Makers Of Universe ‘ ह्या नावाने एक सूची प्रसिद्ध केली. प्रत्येक भारतीयाला गौरवास्पद वाटेल, महाआश्चर्य वाटेल आणि त्यांच्या मनी रुची निर्माण होईल अशा प्रकारची घटना म्हणजे त्या सूचित महाकारूणीक भगवान बुद्धाचे नाव प्रथम क्रमांकावर नोंदविण्यात आले. जगातील सुमारे 200 देशांमधून हा सन्मान भारताला मिळावा हे भारतीयांना भूषणावर आहे, यात शंका नाही. पण या लक्षणीय घटनेची जेवढी दखल भारतीय समाजाने घ्यायला हवी होती तेवढी घेतली नाही, म्हणून या देशातील काही धूर्त मूर्ख पाखंडी लोक तथागत भगवान बुद्धाचे तत्वज्ञान कालबाह्य झाले असे म्हणतात. 2009 मध्ये जिनेव्हा येथे ‘ International Coalition For The Advancement Of Religion and Spirituality ‘ या संस्थेने आयोजित केलेल्या 200 पेक्षा अधिक धर्मगुरूंच्या एका वर्तुळ परिषदेत (Round Table Conference) व्यक्तिगत आणि सार्वजनिक पातळीवर जगभर शांतता स्थापित करण्यासाठी, मानवामानवाप्रति करुनेची अभिवृद्धी आणि सोबतच नैसर्गिक संपदांचे रक्षण अशा तीन निकषावर जगातील सर्वश्रेष्ठ धर्म म्हणून बौद्ध धर्माची निवड केल्या गेली. विस्मयकारक प्रसंग असा की अनेक धर्मगुरूंनी आपल्या धर्माऐवजी बौद्ध धर्माच्या निवडीसाठी आपले बहुमूल्य मत नोंदविले. बौद्ध धर्माने जगात शांतता, करुणा ,समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या मानवी मूल्यांचे नेहमीच प्रचलन केले आहे. या वर्तुळ परिषदेत बौद्ध धर्माबाबत असाही ऊहापो
ह करण्यात आला की, जगात आतापर्यंत बौद्ध धर्माच्या नावाखाली कोठेही दोन गटात, दोन राष्ट्रात युद्ध झाले नाही. असे इतर धर्माच्या बाबतीत म्हणता येणार नाही.
जेरुसेलमच्या ( इस्राईल ) एका धर्मगुरूंनी तर असे म्हटले:’मी जरी येऊ दे धर्मावर प्रेम करतो, तरीपण माझ्या मताप्रमाणे बौद्ध धर्म हाच सर्वोत्कृष्ट धर्म आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो की, मी दररोज विपश्यना समाधी लावतो’. बौद्ध धर्माला सर्वोत्कृष्ट धर्म म्हणून घोषित केले पण प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट अवार्ड स्वीकारण्यासाठी कोणीही बौद्ध धर्म गुरु पुढे आला नाही. ब्रह्मदेशातील बौद्ध धर्म गुरु वयोवृद्ध भिक्खू घूराता हंता (Bhikkhu Ghurata Hanta) या सन्मानाबद्दल म्हणाले: ‘आम्ही या सन्मानाने भारावून गेलो आहोत. हा अवार्ड केवळ आमचा नसून तो जागतिक मानवतेचा अवार्ड आहे’ अशी भावना व्यक्त केली. ( संदर्भ: सुगत क्रांती, लेखक विश्वनाथ शेगावकर आय ए एस, सेवानिवृत्त, मनोगत) सारे जग तथागत भगवान बुद्धाकडे आशेच्या नजरेने पहात असताना आमच्या देशातील पाखंडी ब्राह्मणवादी विचारसरणीचे लोक आंबेडकरवादाचा बुरखा पांघरून बुद्धाचे तत्वज्ञान आता कालबाह्य झाले असे म्हणतात. वरवर अशा आंबेडकरवादी वाटणाऱ्या धूर्त, पाखंडी ब्राह्मणवादी विचारसरणीच्या लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत