प्रत्येकाने आपल्यातील कौशल्य ओळखून यशस्वी होण्याचा मार्ग निवडावा : -उद्योजक बाबासाहेब पाटील

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
कौशल्य ,रोजगार ,उद्योजकता व नाविन्यता विभाग ,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई ,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुळजापूर येथे श्री छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन दिनांक 19 जून 2024 रोजी तुळजाभवानी पुजारी मंगल कार्यालय तुळजापूर येथे पार पडले याप्रसंगी उद्घाटन पर कार्यक्रमात बोलताना उद्योजक तथा चेअरमन आय एम सी ऑफ आयटीआय श्री बाबासाहेब पाटील यांनी वरीप्रमाणेच आवाहन केले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी श्री प्रवीण औताडे हे उपस्थित होते.

याप्रसंगी श्री संजय गुरव, सहाय्यक आयुक्त ,कौशल्य रोजगार व उद्योजकता ,धाराशिव, लोहारा आयटीआयचे प्राचार्य श्री एस बी कांबळे, श्रीहरी सोळंके, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी ,धाराशिव तसेच प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून श्री गणेश चादरे, करिअर कौन्सेलर,टाटा सामाजिक विकास संस्था तुळजापूर , डॉ. सुयोग अमृतराव, संचालक व्यवस्थापन शास्त्र विभाग विद्यापीठ उपकेंद्र, धाराशिव ,प्रा. अमोल पवार, motivational speaker विविध महामंडळाचे, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी, बँकांचे प्रतिनिधी, शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक ,विद्यार्थी महाविद्यालयीन , युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते… हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्राचार्य श्री बिरादार एम. व टीम तुळजापूर यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्प निदेशक श्री मनोज चौधरी व किरण झरकर यांनी केले . या कार्यक्रमाचा लाभ तुळजापूर परिसरातील सातशे उमेदवारांना झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत