महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

निष्पक्षतेच्या आणि पुरोगामीत्वाच्या बुरख्याखाली लपलेले आंबेडकर विरोधक ➡️ डॉ य दि फडके

वसंत मुन विरुध्द डॉ य दि फडके……

बुद्ध आणि त्यांचा धम्म

आम्हीही इतिहास घडवला

घटना परिषद

स्वतःला निष्पक्ष इतिहासकार संबोधणारे डॉक्टर य दीं फडके , बाबासाहेब आणि आंबेडकरी चळवळीचा विषय आल्यावर मात्र आंबेडकरी चळवळीचा विरोधात शक्य होईल तितक्या संदर्भाची मोडतोड करून आणि वेळप्रसंगी खोटे बोलून देखील लिखाण करत…
1 डिसेंबर 1991 च्या महाराष्ट्र टाइम्स दैनिकाच्या रविवारच्या पुरवणी मध्ये डॉक्टर य दी फडके यांनी ‘ज्ञानोपासक डॉक्टर आंबेडकर’ हा लेख प्रसिद्ध केला आणि त्याचा समारोप करताना ते लिहितात बाबासाहेब म्हणाले होते ‘आपल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये स्वतंत्र किंवा मूलगामी असे काही नसून आपण केवळ संकलक आहोत’ ….. बाबासाहेबांची हे वाक्य कशा संदर्भात आहे हे डॉक्टर फडके जाणीवपूर्वक दुर्लक्षित करतात … बाबासाहेबांनी धम्म प्रक्षिप्त विहीन करणे हेच या अभिजात ग्रंथाचे मूलगामित्व आहे .डॉ फडके यांच्या लेखाची चिकित्सा करताना फडके यांचा निष्पक्षतेचा आणि पुरोगामीत्वाचा बुरखा वसंत मुन यांनी पूर्ण फाडून टाकला. वास्तविकता ही आहे की ,बाबासाहेबांच्या अभिजात ग्रंथाचे मूलगामित्व आणि सांस्कृतिक परिणाम करणारे इफेक्टस् नाकारण्यासाठी डॉक्टर य दी फडके खोटे बोलतात…..

माजी मंत्री आणि स्तंभलेखक अरुण शौरी यांनी बाबासाहेबांच्या कार्यावर चिखलफेक करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला , त्याला उत्तर देण्याच्या नावाखाली डॉक्टर फडके यांनी सत्याचा एवढा विपर्यास केला सोबत घटना समितीमधील सर्व महत्त्वाचे संदर्भ दाबून टाकले आणि बी एन राव या साध्या अधिकाऱ्याला बाबासाहेबांच्या कार्यात भागीदारी देण्याचा वांझोटा प्रयत्न केला ,या फडके यांच्या लिखाणात प्रचंड दिशाभूल करणारे वक्तव्य पहाण्यास मिळतात. कॉन्स्टिट्यूशन असेंबली डिबेट व्हॉल्युम 11 यामध्ये घटना समितीत काय घडले याचे विस्तृत वर्णन आहे याशिवाय घटना पूर्ण झाल्यानंतर ज्या 71 विद्वान घटना समिती सदस्यांनी भाषण केले त्यामधील एक जण वगळता कोणीही राव यांचे नाव घेतले नाही… सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाबासाहेबांनी नाकारलेल्या सूचना घटना समिती नाकारत असे व त्यांनी स्वीकारलेल्या सूचनाच घटना समिती स्वीकारत असे…

डॉक्टर फडके याच संदर्भात नाही तर उर्मिला पवार आणि मीनाक्षी मून लिखित ‘आम्हीही इतिहास घडवला’ या ग्रंथाची प्रस्तावना लिहिताना देखील असेच खोटे विधान करतात.. बाबासाहेब आणि संविधान सभा , महात्मा फुले या संदर्भांत तर डॉ फडके अक्षरशः खोटे बोलतात……
या पुढे कोणीही बाबासाहेबांची तोंडदेखली स्तुती केल्यास आपण हुरळून जाण्याची आवश्यकता नाही तर त्या संबंधित व्यक्तीच्या पूर्ण लेखनाची चिकित्सा प्रथम केली पाहिजे….

Prakash Tupe

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!