राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण…

अर्जून पुरस्कारने तिरंदाज आदिती स्वामी आणि तेजस देवतळे,क्रिकेटपटू मोहम्मद शमी,टेनिसपटू ऐहिका मुखर्जी यांच्यासह इतर खेळाडूंना राष्ट्रपतींनी गौरवले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारा वितरण केले. मल्लखांब प्रशिक्षक गणेश देवरुखकर यांना द्रोणाचार्य पुरस्कार राष्ट्रपतींनी आज प्रदान केला.यावेळी राष्ट्रपतींनी द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार,क्रीडा प्रोत्साहन पुरस्कारांचंही वितरण केले.केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह विविध मान्यवर,खेळाडूंचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत