
काल जयपूर मधल्या पोलिस संचालक आणि पोलिस महानिरिक्षकांच्या तीन दिवस चाललेल्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. नव्या फौजदारी कायद्यांमुळे गुन्ह्यांची न्यायप्रक्रिया पूर्णपणे बदलणार असल्याच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. हे नवे कायदे नागिरक प्रथम,प्रतिष्ठा प्रथम आणि न्याय प्रथम या त्रिसूत्रीवर बेतलेले असल्याचंही त्यांनी सांगितले. नव्या कायद्यांमध्ये महिला आणि मुलींच्या अधिकारांचा आणि त्यांना योग्य ती सुरक्षा पुरवण्यावर विशेष लक्ष देण्यात आल असल्याचंही त्यांनी सांगितले. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पोलिस पदकही प्रदान करण्यात आले. सर्व सामान्यांच्या मनात पोलिसांची सकारात्मक प्रतिमा तयार व्हायला हवी,लोकांसाठी सकारात्मक सूचना आणि संदेश पोहोचवण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. अरबी समुद्रात भारतीय नौदलाने केलेल्या कार्यवाहीचाही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. गृहमंत्री अमित शाह आणि सुरक्षा सल्लागार अजित डोवालही या संमेलनाला उपस्थित होते.या परिषदेत सायबर गुन्हे,दहशतवाद आणि नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यातल्या विविध आव्हानांचाही आढावा घेण्यात आला. यावेळी कारागृहांमध्ये सुधारणा आणि पोलिसांची व्यापक व्यवस्था आणि सुरक्षेविषयीही विचारविनिमय करण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत