
या मोहिमेत आतापर्यंत ४४ हजार १५ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट चुकवल्याचा संशय असलेल्या २९ हजार २७३ बोगस कंपन्या सापडल्या आहेत. वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीतले घोटाळे रोखण्यासाठी केंद्र आणि राज्याने संयुक्तपणे मागील वर्षी मे महिन्यापासून बनावट नोंदणी विरोधात विशेष मोहिम सुरू केली आहे. यामुळे एकूण ४ हजार ६४६ कोटी रुपयांची बचत झाली आहे. या प्रकरणी आतापर्यंत १२१ जणांना अटक केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत