
दोन्ही संघांचा पहिला डाव संपून यजमान संघाच्या दुसऱ्या डावात 3 गडी बाद बासष्ठ धावा झाल्या आहे. सामन्याचे सुकाणू भारताच्या हातात असले तरी तो अतिशय़ चुरशीचा राहण्याचा अंदाज आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात केप टाउन इथे दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशीच तेवीस गडी बाद झाले. विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारताकरिता हा सामना महत्वाचा आहे. यजमानांचा पहिला डाव पंचावन धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारत केवळ 153 धावा करु शकला. महंमद सिराजनं केवळ १५ धावांच्या मोबदल्यात सहा बळी घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत