नायगाव इथे सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक बांधण्याचा निर्णय…

नायगाव इथे सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक बांधण्याचा निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री छगन भुजबळ, शंभूराज देसाई, अतुल सावे, आदिती तटकरे या राज्यातल्या मंत्र्यांसह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांचं कर्तृत्व, त्याग, योगदान यांची माहिती समाजातील प्रत्येक घटकाला व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. सावित्रीबाईंचं जन्मगाव असलेल्या नायगावमध्ये सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी इथल्या नूतनीकृत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. तर मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ तसंच अन्य मंत्री आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जयंतीनिमित्त कुलगुरु डॉक्टर सुरेश गोसावी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होते. समाजातील असमानतेमुळे स्त्रीयांना शिक्षण घेता येत नसताना सावित्रीबाईंनी असामान्य धैर्य दाखवत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, प्रगतीशील समाजाचा पाया रचला असे डॉ. गोसावी यावेळी म्हणाले. यावेळी मान्यवरांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोरील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.नवी मुंबई महानगरपालिकेनं यानिमित्त विशेष समारंभ आयोजित केला होता. यामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराचं वितरण करण्यात आले. नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. बीड शहरात सावित्रीमाई फुले सार्वजनिक जयंती उत्सव संयोजन समितीनं रॅली काढली होती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत