क्रांतीकारी – विजयस्तंभास मानवंदना ।
Prasheek Prabuddha Parivar.
ऊठ मित्रा !
पुण्यातील भिमा कोरेगावला जाऊन ये, विजयस्तंभाला मान वंदना देऊन आपल्या पूर्वजांकडून थोडेसे शौर्य घेऊन ये ।
३१ डिसेंबरच्या राती, भिमानदीच्या काठी हक्क आणि स्वाभिमानासाठी सुरू झाले घनघोर युद्ध, सैतानी पेशवाईला मुठभर महार सैनिकांनी पिटाळून १ जानेवारी, १८१८ ला जिंकले ते एक क्रांतीकारी युद्ध शौर्याची साक्ष देत उभ्या असलेल्या अशा,
या क्रांतीस्तंभास बाबासाहेबही दरवर्षी भेट देत, अन आपल्या पूर्वजांच्या पराक्रमापासुन सदैव स्फुर्ती घेत।
म्हणून तर बाबासाहेबानी “न भुतो न भविष्यती” असा पराक्रम केला, अन लाचार निर्जीच ह्या देहाला, स्वाभिमानी, अनमोल सु – ‘सजीव’ बनविला। ह्याची जाण ठेऊन मित्रा तुही ऊठ,
आता नको अडकुस थर्टीफस्टच्या त्या वांझोट्या, बेधुंद, निरर्थक पार्टीत।
१ जानेवारीला तुही मानवंदना दे या विजयस्तंभास थेट बाबासाहेबांच्याच ऐटित!
एक मात्र नेहमीच लक्षात ठेव तू, या विजसस्तंभास मानवंदना देताना,
आपणांस आपला इतिहास
लक्षात ठेवायचा आहे –
कारण, आपणांसही इतिहास घडवायचा आहे!
आपणांसही इतिहास घडवायचा आहे !!
????????जय भीम – जय भारत!????????
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत